‘लोकमत’चे उपक्रम समाजोपयोगी
By Admin | Updated: November 14, 2014 00:54 IST2014-11-14T00:31:38+5:302014-11-14T00:54:11+5:30
लातूर : ‘लोकमत’चे उपक्रम समाजासाठी उपयोगी आहेत. वर्षभरातील विविध उपक्रमांतून ग्राहकांंना आनंद मिळतो. हे उपक्रम राष्ट्रहितासाठीही उपयोगी असल्या

‘लोकमत’चे उपक्रम समाजोपयोगी
लातूर : ‘लोकमत’चे उपक्रम समाजासाठी उपयोगी आहेत. वर्षभरातील विविध उपक्रमांतून ग्राहकांंना आनंद मिळतो. हे उपक्रम राष्ट्रहितासाठीही उपयोगी असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’च्या वतीने आयोजित ‘दसरा-दिवाळी खरेदी महोत्सव २०१४’ चा लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ सोलापूरचे सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, लातूरचे शाखा व्यवस्थापक नितीन खोत, मोरमुकुट ब्रिजवासी, प्रवीण ब्रिजवासी, संजय ब्रिजवासी, तुकाराम पाटील, बापूसाहेब मदने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या पारितोषिकांमध्ये प्रथम पारितोषिक ३०’ एलईडी टीव्ही-एओसी हे अयुब करिम बागवान : कुपन नं. १५२९६ (वृंदावन एजन्सी), द्वितीय पारितोषिक- रेफ्रिजरेशन: कुपन नं. २२२५१ (मनोजा एजन्सी), तृतीय पारितोषिक -वॉशिंग मशीन : माधवी नाईक-१०४३० (मदने किडस्), तर चौथे पारितोषिक- मायक्रो ओव्हन : राजेश मानधने- कुपन नं. ७३७० (दिनेश एन्टरप्राईजेस) यांना जाहीर करण्यात आले. तर उर्वरित सहभागी ग्राहकांनाही पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकमत’चे सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार संतोष झुंजे यांनी मानले. (प्रतिनिधी)