शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट -शहाजीराजे भोसले स्मारकाची केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 15:32 IST

वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली. 

खुलताबाद : वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली. मात्र शासकीय यंत्रणा अद्यापही या बाबतीत सुस्तच  असल्याने  शिवप्रेमी नाराज झाले आहेत.

वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता व साफसफाई झाली नव्हती. त्यामुळे स्मारक चहूबाजूंनी गाजर  गवतांनी व झाडाझुडूपांनी वेढले गेले होते. अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढे येत शहाजीराजे भोसले स्मारकाची स्वच्छता मोहीम हाती घेतली.

वेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गढी होती. तेथे शहाजीराजे भोसले यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र मागील ११ वर्षांपासून स्मारकाचे काम बंद असल्याने शहाजीराजे भोसले स्मारक चोहोबाजूंनी गाजरगवतांनी,  झाडाझुडूंपानी वेढले गेले आहे. स्वच्छता नसल्याने पर्यटकही याठिकाणी फिरकत नाहीत.

शासनाच्या दुर्लक्षामुळे शहाजीराजे भोसले स्मारकाचेे काम ११ वर्षांपासून रखडले आहे. स्मारकाच्या झालेल्या कामाचीही आता तोडफोड झाली आहे.  समता परिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे सा. बां. च्या अभियंत्यांना सांगितले, परंतु त्यांनी दखलही घेतली नाही, असे म्हणणे  परिषदेच्या  पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मांडले.

 

टॅग्स :Khulatabadखुल्ताबादhistoryइतिहासMarathwadaमराठवाडा