शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

लोकमत इफेक्ट : 'त्या' कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 7:28 PM

जटवाडा रोडवरील हर्सूल तलावासमोरील हनुमाननगर येथे राहणाऱ्या रंजना भोसले या विधवेला दोन लहान मुले आणि दोन मुली आहेत.

औरंगाबाद : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून काम बंद पडल्याने उपलब्ध धान्य जास्त दिवस पुरावे म्हणून पाच जणांच्या कुटुंबाने प्रत्येकी एक पोळी खाऊन दिवस काढले, हे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रकाशित करताच या कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह  अनेक जण धावून गेले. या मदतीमुळे आता रंजना भोसले यांच्या कुटुंबाची उपासमार थांबेल.

जटवाडा रोडवरील हर्सूल तलावासमोरील हनुमाननगर येथे राहणाऱ्या रंजना भोसले या विधवेला दोन लहान मुले आणि दोन मुली आहेत. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्यामुळे ती आणि तिची मुले एक पोळी खाऊन दिवस काढत होते. याविषयी ‘लोकमत’ने शनिवारी ‘एकच पोळी खाऊन दिवस काढत आहे पाच जणांचे कुटुंब’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार किशोर देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच तिच्या घरी धाव घेतली व त्या कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल एवढे किराणा सामान दिले. 

पगारिया फाऊंडेशनच्या वतीने वैभव घुले यांनी रंजना भोसले यांना गव्हाचे पीठ, तांदूळ दिला. मानवसेवा  ग्रुपचे आनंद अग्रवाल यांनी सकाळी महिलेच्या घरी जाऊन त्यांना रेशन कीट, गहू आणि तांदूळ दिले. यासोबतच रंजना यांच्या घराशेजारील २० गरीब कुटुंबांनाही  गहू आणि तांदूळ वाटप केले. 

बुलंद छावा संघटनेचे मनोज गायके यांनी रंजना यांच्या चारही मुलांना कपडे, घरखर्चासाठी काही रक्कम दिली. जिल्हा  मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी पंधरा दिवस पुरेल एवढे रेशन कीट, मुलांना कपडे, बूट आणि एक महिन्याचे घरभाडे दिले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी  भोसले कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पंधरा दिवस पोटभर जेवण करता येईल एवढे रेशन कीट आणि किराणा सामान पाठवले. बोधी बहुउद्देशिय संस्थेचे  प्रा. प्रशांत दंदे  यांनी त्यांना रेशन कीट दिले. 

‘लोकमत’मुळे झाली पोटभर जेवणाची सोय मदतीसाठी आलेल्या अग्रवाल यांनी ‘लोकमत’मध्ये बातमी आल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीकडून बातमी वाचून घेतली. सकाळपासून सायंकाळपर्यंत आठ ते दहा जणांनी मदत आणून दिल्याने मी आणि माझे कुटुंब दोन वेळचे पोटभर जेवण करू शकणार आहे. माझ्या मुलांना कपडेही मिळाले आहेत. मी ‘लोकमत’ची आभारी आहे. - रंजना भोसले 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक