‘लोकमत’च्या दसरा दिवाळी खरेदी महोत्सवाची सोडत जाहीर
By Admin | Updated: November 25, 2015 00:20 IST2015-11-25T00:09:15+5:302015-11-25T00:20:38+5:30
उस्मानाबाद : ‘लोकमत’ व गुडलक इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने घेण्यात आलेल्या दसरा दिवाळी खरेदी महोत्सव २०१५ चा लकी-ड्रॉ आज मंगळवारी काढण्यात आला.

‘लोकमत’च्या दसरा दिवाळी खरेदी महोत्सवाची सोडत जाहीर
उस्मानाबाद : ‘लोकमत’ व गुडलक इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने घेण्यात आलेल्या दसरा दिवाळी खरेदी महोत्सव २०१५ चा लकी-ड्रॉ आज मंगळवारी काढण्यात आला.
समता नगरातील परिमल मंगल कार्यालयात सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमात १११ बक्षीस विजेते जाहीर करण्यात आले. स्कुटी पेप प्लस या प्रथम क्रमांकाच्या बक्षीसाचे मानकरी अंगद अर्जुन काटे (कूपन क्र. २५४२३) ठरले आहेत. ३२ इंची एलईडी टीव्ही या द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सौदागर गोरे (कूपन क्र. ५१८९) व रणजित मुळे (कूपन क्र. ७५०) यांना लागले आहे. इलेक्ट्रोलक्स फ्रीज या तृतीय क्रमांकाच्या बक्षीसाचे मानकरी प्रकाश नरहरी निचळ (कूपन क्र. २८४०) ठरले आहेत.
या कार्यक्रमास सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. दिग्गज दापके, मिनाक्षी टीव्हीएसचे आशिष मोदाणी, गुडलक इलेक्ट्रानिक्सचे आनंद बेळंमकर व जलाराम शॉपींग मॉलचे मनिष खंडेरिया, अमन इलेक्ट्रॉनिक्सचे अकबर पठाण, एस.आर. इलेक्ट्रॉनिक्सचे शेख रहीम पाशुमियाँ ‘लोकमत’चे सहाय्यक सर व्यवस्थापक रमेश तावडे, शाखा उपव्यवस्थापक मच्छिंद्र सुडके जाहिरात उपव्यवस्थापक सुशिल झगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘लोकमत’ व गुडलक इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने घेण्यात आलेल्या दसरा दिवाळी खरेदी महोत्सवात २३ व्यवसायिकांनी सहभाग नोंदविला होता. त्यांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कुपन्सधारकांची संख्या ३० हजारापर्यंत होती. या संकलित कूपन्समधून १११ बक्षीसांचा ‘लकी-ड्रॉ’ मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात मच्छिंद्र सुडके यांनी योजनेची माहिती दिली. सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले तर आभार विकास सुर्डी यांनी मानले. उर्वरित विजेत्यांची नावे २६ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.