लोकमत कॅम्पस क्लबचे चर्चासत्र
By Admin | Updated: July 27, 2014 01:15 IST2014-07-27T00:14:59+5:302014-07-27T01:15:39+5:30
जालना : लोकमत कॅम्पस क्लब व शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे चर्चासत्र शनिवारी पार पडले.
लोकमत कॅम्पस क्लबचे चर्चासत्र
जालना : लोकमत कॅम्पस क्लब व शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे चर्चासत्र शनिवारी पार पडले.
या चर्चासत्रात औरंगाबाद लोकमत टाईम्सच्या लक्ष्मी मूर्ती यांनी विविध विषयांवर उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच लोकमत समूहाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कॅम्पस क्लब उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली.
यावेळी अनेक मुख्याध्यापकांनी लोकमत समूहाच्यावतीने आयोजित अनेक उपक्रम जालन्यात राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अनिल जिंदल स्कूलचे तिमीर कुमार सेनगुप्ता, आरती गायकवाड, सिद्धीकी, शेमरॉक यंगिस्तान स्कूलच्या श्रद्धा रूणवाल, बनप्रित झुनझुनवाला, गोल्डन ज्यूबिलीचे प्रसाद चौधरी, रॅन इंटरनॅशनल स्कूलचे अनिता निर्मल, सेंटमेरी स्कूलचे सतीश कमलाकर, पोदार स्कुलचे चकोर गोस्वामी, माय रिच डॅड अॅकेडमी मधून तुकाराम मार्कंडेय, अर्पित, विजयकुमार खरात, देवगिरी इग्लिश स्कुलचे के. ए. निर्मल, ए.एस. धावणे, सनराईज इंग्लिश स्कूलचे रजनी बाकोडे, एस. बी. हायस्कूलचे के. आर. बगेरीया, प्रदीप भावठाणकर, जी. जी . बगडिया वर्ल्ड स्कूलचे दीपिका
अग्रवाल अश्विनी पेंढारकर, किड्स केंब्रीजच्या अलका गव्हाणे, प्रशांत कुलथे, संस्कृती विद्या मंदिरच्या अश्विनी धन्नावत, माधुरी जोशी, आॅक्सर्फड इग्लिंश स्कुलमधून विनोद चौबे, सय्यद मुक्तार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)