औरंगाबाद शहरात आजपासून ‘लोकमत आॅटो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:50 IST2018-03-08T00:50:15+5:302018-03-08T00:50:20+5:30

शहरात रात्री-अपरात्री घरी परताना विशेषत: महिला-तरुणींना रिक्षा प्रवासात अनेकदा वाटणारी असुरक्षितता संपविणारा, त्यांचा सन्मान करणारा आणि रिक्षातील प्रवासात कमीत कमी वेळेत शहरासह देश-विदेशातील घडामोडींची माहिती देणारा आगळा-वेगळा उपक्रम ‘लोकमत’च्या माध्यमातून औरंगाबादेत जागतिक महिला दिनापासून सुरू होत आहे. १०० रिक्षांच्या माध्यमातून शहरवासीयांसाठी ‘लोकमत आॅटो’ या उपक्रमाचा गुरुवारी (दि. ८) शुभारंभ होत आहे.

Lokmat Auto from Aurangabad city today | औरंगाबाद शहरात आजपासून ‘लोकमत आॅटो’

औरंगाबाद शहरात आजपासून ‘लोकमत आॅटो’

ठळक मुद्देउपक्रम : लोकमत आॅन व्हील फॉर स्मार्ट सिटीजन; १०० रिक्षांच्या माध्यमातून आरंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात रात्री-अपरात्री घरी परताना विशेषत: महिला-तरुणींना रिक्षा प्रवासात अनेकदा वाटणारी असुरक्षितता संपविणारा, त्यांचा सन्मान करणारा आणि रिक्षातील प्रवासात कमीत कमी वेळेत शहरासह देश-विदेशातील घडामोडींची माहिती देणारा आगळा-वेगळा उपक्रम ‘लोकमत’च्या माध्यमातून औरंगाबादेत जागतिक महिला दिनापासून सुरू होत आहे. १०० रिक्षांच्या माध्यमातून शहरवासीयांसाठी ‘लोकमत आॅटो’ या उपक्रमाचा गुरुवारी (दि. ८) शुभारंभ होत आहे.
लोकमत भवन, जालना रोड येथे सकाळी ११ वाजता या उपक्रमाचा उद््घाटन समारंभ होणार आहे. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण (वाहतूक शाखा), पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून रिक्षाचालकांना ‘लोकमत’शी जोडण्याचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून त्यांची समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. अनेकदा महिला-तरुणींमध्ये रिक्षा प्रवासाविषयी साशंकता निर्माण व्यक्त होते. ही साशंकता दूर करणारे एक वेगळे पाऊल ‘लोकमत आॅटो’ या उपक्रमातून टाकले जात
आहे.
प्रत्येक रिक्षावर ‘आम्ही महिलांचा सन्मान करतो’ असे ब्रीदवाक्य राहणार आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील प्रवाशांबरोबर महिला, तरुणींमध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण होईल. याबरोबर रिक्षांमध्ये ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ आणि ‘लोकमत टाइम्स’ ही वृत्तपत्र राहणार आहेत. यातून शहरातील एका भागातून दुसºया भागात रिक्षातून प्रवास करताना पर्यटक, सर्वसामान्य प्रवाशांना अगदी कमीत कमी वेळेत विविध घटनांची माहिती होण्यास मदत होईल.

Web Title: Lokmat Auto from Aurangabad city today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.