शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

Lokmat APL: मनजित प्राइड ठरला एपीएल- १० चा चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:35 IST

अंतिम सामन्यात शक्ती स्ट्रायकर्सवर ९५ धावांनी दणदणीत विजय 

औरंगाबाद : अपूर्व वानखेडे, सचिन शेडगे व करण जाधव यांची चौकार, षटकारांची आतषबाजी आणि त्यानंतर कार्तिक बालय्याच्या तेजतर्रार भेदक गोलंदाजीच्या बळावर करण राजपाल यांच्या मनजित प्राइड वर्ल्ड संघाने गरवारे स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लोकमत औरंगाबाद प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये श्याम अग्रवाल यांच्या शक्ती स्ट्रायकर्सवर ९५ धावांनी दणदणीत मात केली. त्याचबरोबर या स्पर्धेत सलग विजयी षटकारांसह मनजित प्राइड वर्ल्डचा संघ चॅम्पियन ठरला.

मनजित प्राइडने १५ षटकांत २१६ धावांचा एव्हरेस्ट रचल्यानंतर प्रत्युत्तरात शक्ती स्ट्रायकर्सचा संघ कार्तिक बालय्याच्या तेजतर्रार गोलंदाजीसमोर अवघ्या १३.५ षटकांत १२१ धावांत ढेपाळला. सय्यद सर्फराज (२५) आणि जाेगिंदर तुसमकर (३२) यांच्याशिवाय त्यांचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. मनजित प्राइडकडून कार्तिक बालय्याने १७ धावांत ४ गडी बाद करीत निर्णायक कामगिरी केली. त्याला अपूर्व वानखेडेने १२ धावांत २ बळी घेत साथ दिली.

विजयासाठी पाठलाग करताना युवा तेजतर्रार गोलंदाज कार्तिक बालय्याने पहिल्या चार फलंदाजांना तंबूत धाडताना शक्ती स्ट्रायकर्सच्या आघाडीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. यातून त्यांचा संघ सावरू शकला नाही. कार्तिकने त्याच्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर स्वत:च्या गोलंदाजीवर जबरदस्त झेल घेत अनुभवी इंद्रजित उढाण याला भोफळाही फोडू न देता माघारी पाठवले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर इम्रान पटेलला त्रिफळाबाद केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर या स्पर्धेत आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीने सर्वांना मोहित करणाऱ्या नयन चव्हाणलादेखील त्याने त्रिफळाबाद करीत तिसरा, तर युवा प्रतिभवान अष्टपैलू आर्यन शेजूळ याला अपूर्व वानखेडेकरवी झेलबाद करीत बळींचा चौकार ठोकला. त्यानंतर कौसीन कादरीला हिंदुराव देशमुखने आणि सय्यद परवेझने पंकज फलकेला बाद करीत शक्ती स्ट्रायकर्सच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणल्या.

शक्ती स्ट्रायकर्स : नयन चव्हाण त्रि. गो. कार्तिक बालय्या २६, इंद्रजित उढाण झे. व गो. कार्तिक बालय्या ०, इम्रान पटेल त्रि. गो. कार्तिक बालय्या ०, आर्यन शेजूळ झे. अपूर्व वानखेडे गो. कार्तिक बालय्या ३, कौसीन कादरी त्रि. गो. हिंदुराव देशमुख ६, पंकज फलके पायचीत गो. सय्यद परवेझ ९, राहुल जाेनवाल धावबाद ७, हुसेन अमोदी झे. सलमान अहमद गो. सय्यद आरीफ १, सय्यद सर्फराज नाबाद २५, जोगिंदर तुसमकर झे. शेडगे गो. अपूर्व वानखेडे ३२, प्रवीण कुलकर्णी झे. संदीप राठोड गो. अपूर्व वानखेडे ०, अवांतर : १२, एकूण : १३.५ षटकांत सर्वबाद १२१.

गोलंदाजी : संदीप राठोड १.१/०/२०/०, कार्तिक बालय्या ३/०/१७/१, हिंदुराव देशमुख २/०/१६/१, सय्यद परवेझ ३/०/२८/१, सय्यद आरेफ २/०/१५/१, सलमान अहमद १/०/८९/०, अपूर्व वानखेडे ०.५/०/१२/२.

स्पर्धेचे मानकरीस्टार प्लेअर ऑफ द मॅच : अपूर्व वानखेडे (नाबाद ६० धावा)मॅन ऑफ द मॅच : कार्तिक बालय्याबेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट : सय्यद सर्फराजबेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट : सचिन शेडगेस्टार प्लेअर ऑफ द सिरीज/ बेस्ट आउटसाइड प्लेअर : नयन चव्हाणमॅन ऑफ दि सिरीज : सलमान अहमद.

खेळाडूंना मिळाली २५ लाखांपर्यंत पारितोषिकेएपीएलच्या दहाव्या पर्वात खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव झाला. जवळपास २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळविण्याची संधी खेळाडूंना मिळाली.पुरस्कारप्राप्त खेळाडूंना मिळणार आयफोनदहा संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत मित्तल इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मालिकावीर, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि ‘बेस्ट आउटसाइडर प्लेअर’ यांच्यासाठी प्रत्येकी एक आयफोन बक्षीसरूपाने देण्यात येणार आहे. या चार आयफोनची एकूण किंमत तब्बल दोन लाख ८० हजार असणार आहे.विजेत्याला दोन लाख, तर उपविजेत्यास एक लाखएपीएल स्पर्धेतील चॅम्पियन ठरणाऱ्या संघास दोन लाखांचे, तर उपविजेत्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.सामनावीर खेळाडूस मोफत मेंबरशिपप्रत्येक सामन्यात सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूंना हेल्थ ॲण्ड हार्मनी जिमतर्फे एका वर्षासाठी मोफत मेंबरशिप मिळणार आहे. स्पर्धेत एकूण २३ खेळाडूंना सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे.विजेत्या संघासाठी असणार गोवा सहलत्याचप्रमाणे स्मिता हॉलिडेजतर्फे एपीएलच्या अंतिम विजेत्या संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफसह २० ते २२ जणांना गोव्याची सहल असणार आहे. यात २ रात्र आणि ३ दिवस हॉल्ट राहणार आहे.

अफाट क्रिकेट प्रतिभेला चालना मिळेलइंडियन ऑईल क्रीडा आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणात पाठबळ देते. इंडियन ऑईलमध्ये अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार विजेत्यांसह १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय ‘स्पोर्ट्स स्टार’ कार्यरत आहेत. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांसारखे प्रख्यात क्रिकेटपटू इंडियन ऑईल कुटुंबाचा भाग आहेत. इंडियन ऑईल एक विशेष क्रीडा शिष्यवृत्तीही प्रदान करते. त्यातून नवीन प्रतिभावान खेळाडूंना लहानपणापासूनच मदत दिली जाते. किंबहुना, इंडियन ऑईलचे अनेक आघाडीचे खेळाडू सुरुवातीला ‘स्पोर्ट्स स्कॉलर’ म्हणून कंपनीत सामील झाले होते. इंडियन ऑईल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे प्रायोजकत्व करून खेळांना प्रोत्साहन देते. औरंगाबाद प्रीमियर लीग (एपीएल) सोबत इंडियन ऑईलची भागिदारी या प्रदेशात उपस्थित असलेल्या अफाट क्रिकेट प्रतिभेला प्रोत्साहन आणि चालना देईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.- अजित ढाकरस, मुख्य महाव्यवस्थापक, इंडियन ऑईल (प्रादेशिक सेवा), इंडियन ऑईल, पश्चिम क्षेत्र, मुंबई.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद