‘लोकसभे’चे मानधन रखडले
By Admin | Updated: October 30, 2014 00:26 IST2014-10-30T00:17:08+5:302014-10-30T00:26:48+5:30
परंडा : सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिवस-रात्र काम केलेल्या परंडा तालुक्यातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून मात्र अद्याप मानधन वाटप करण्यात आले नसल्याने

‘लोकसभे’चे मानधन रखडले
परंडा : सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिवस-रात्र काम केलेल्या परंडा तालुक्यातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून मात्र अद्याप मानधन वाटप करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एप्रिल २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली तर तर मे महिन्यात मतमोजणी झाली. याला आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या निवडणुकीसाठी इतर तालुक्यांप्रमाणेच परंडा तालुक्यातीही तहसील, पंचायत समिती, नगर पालिका, कृषी विभाग, शिक्षण विभाग, शासकीय तंत्र प्रशाला आदी ठिकाणच्या १८१ कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी रात्रेंदिवस मेहनत करून निवडणुकीचे काम केले. परंतु, या कालावधीत त्यांना प्रशासनाकडून देण्यात येणारे अतिकालीन, पोल डे यांचे आर्थिक मानधन अद्यापही देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, परंडा विधानसभा मतदारसंघात असलेल्या भूम आणि वाशी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना हे मानधन वितरित करण्यात आले आहे. परंतू, साडेपाच महिन्यानंतरही परंडा तालुक्यातील कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपलेली नाही. याबाबत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची वारंवार भेट घेऊनही अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणूक कामासाठी परंडा तालुक्यातील १८१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात तहसील कार्यालयातील ६६, पंचायत समितीतील एक, नगर पालिका ३, कृषी कार्यालय १, शिक्षण विभाग १, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ८, शासकीय तंत्र प्रशाला १, भूमी अभिलेख कार्यालय ३, सीना-कोळेगाव विभाग ३, पंचायत समिती १, उपविभागीय भूमी अभिलेख १, ल. पा. उपविभाग १, उपविभागीय कार्यालय १, पोलिस ठाणे ६, उपकोषागार कार्यालय १, पोलीस पाटील ६८, अंगणवाडी सेविका १५ यांचा समावेश आहे. हे सर्वजण गेल्या साडेपाच महिन्यांपासून निवडणूक विभागाच्या मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.