अडत व्यापा-यांकडून लासूर स्टेशन बाजार समितीला तीन कोटींचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:21 IST2018-01-06T00:20:57+5:302018-01-06T00:21:00+5:30
लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मालाच्या परवानाधारक अडत व्यापाºयांनी गेल्या नऊ वर्षांपासून लपवलेली तीन कोटी रुपयांची मार्केट फी वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पणन सहसंचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या कारवाईमुळे व्यापा-यांचे धाबे दणाणले आहे.

अडत व्यापा-यांकडून लासूर स्टेशन बाजार समितीला तीन कोटींचा चुना
विनोद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मालाच्या परवानाधारक अडत व्यापाºयांनी गेल्या नऊ वर्षांपासून लपवलेली तीन कोटी रुपयांची मार्केट फी वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पणन सहसंचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या कारवाईमुळे व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.
शेतकºयांकडून वसूल केलेली संपूर्ण मार्केट फी बाजार समितीला न भरण्याचा प्रकार लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक व्यापा-यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता.
या प्रकाराकडे अनेकांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सदरील प्रकार व्यापा-यांनी बिनदिक्कत पुढे सुरू ठेवला होता. त्यामुळेच प्राथमिक अंदाजात पुढे आलेल्या रकमेचा आकडा तीन कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. सदरील आकडा २००८ ते २०१७ दरम्यानचा आहे.
लिलावात आलेल्या शेतमालाचीच मार्केट फी व्यापारी भरत असत.
लिलावादरम्यान प्रत्येक शेतमालाची नोंद बाजार समितीच्या लिलाव नोंदवहीत होत असते. त्यामुळे तितकी मार्केट फी व्यापाºयांना भरावीच लागते. परंतु त्याआधी व नंतर आलेल्या शेतमालाच्या खरेदीची नोंद त्या वहीत होत नसल्याने व्यापारी त्या व्यवहाराची कच्ची नोंद घेऊन शेतकºयांकडून रीतसर मार्केट फी घेऊन अनधिकृत व्यवहार पूर्ण करून बाजार समितीला चुना लावत
असत.
सभापतींमुळे गौडबंगाल उघडकीस
विद्यमान सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांनी या प्रकरणात लक्ष देऊन प्राथमिक माहितीनुसार समोर आलेल्या मार्के ट फी वसुलीबाबत मार्गदर्शन मागवून वसुली करण्यासाठी सक्षम अधिकाºयांची नेमणूक करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सभापतींच्या पत्रातील मुद्यांची चौकशी करून व्यापाºयांकडे थकीत मार्केट फी वसुलीसंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर रक्कम वसूल झाल्यास बाजार समितीला बुडत असलेली मोठी रक्कम मिळणार असल्याचे उपसभापती दादासाहेब जगताप यांनी सांगितले. या आदेशामुळे येथील परवानाधारक व्यापाºयांत खळबळ तर उडालीच आहे. परंतु जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्येदेखील या पद्धतीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरेदी केलेल्या शेतमालाची पुढे विक्री करताना तो माल चोरीस जाऊ नये किंवा अपघातग्रस्त होऊन नुकसान म्हणून त्याची अधिकृत नोंद असावी, याकरिता व्यापाºयांनीच बाजार समितीच्या मुख्य गेटवर जाणाºया वाहनांच्या क्रमांकासह त्यात असलेल्या वजनासह शेतमालाची नोंद केलेली आहे.
हीच बाब सभापती संभाजी डोणगावकर यांनी हेरून व्यापाºयांनी किती शेतमालाची खरेदी केली होती, याचा लेखाजोखा तयार करून घेतला. त्यावरून व्यापाºयांनी गेल्या नऊ वर्षांत तीन कोटी रुपयांची मार्केट फी लपवल्याचे उघड झाले.