पोलिसांकडून लॉजची झाडाझडती

By Admin | Updated: January 11, 2015 00:55 IST2015-01-11T00:53:50+5:302015-01-11T00:55:23+5:30

उस्मानाबाद : शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयानजीक असलेल्या एका लॉजवर झाडाझडती केली़

Lodge of trees from the Lodge | पोलिसांकडून लॉजची झाडाझडती

पोलिसांकडून लॉजची झाडाझडती


उस्मानाबाद : शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयानजीक असलेल्या एका लॉजवर झाडाझडती केली़ खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती़ मात्र, चौकशीअंती काहींना सोडण्यात आल्याचे वृत्त असून, पोलिसांची ही झाडाझडती फुसका बार ठरली आहे़
उस्मानाबाद शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नजीक असलेल्या एका लॉजमध्ये आक्षेपार्हर हलचाली सुरू असल्याची ‘विश्वसनीय’ माहिती शनिवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना मिळाली होती़ माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने लॉजवर धाड मारली़ धाडमारल्यानंतर तेथे जवळपास अर्धा-पाऊण तास झाडाझडती घेतली़ त्यावेळी लॉजमालक व इतरांची चौकशी करण्यात आली़ चौकशीदरम्यान पोलिसांना कोणताच अनुचित प्रकार आढळून आला नसल्याचे नंतर सांगण्यात आले़ मात्र, पोलिसांनी अर्धा-पाऊण तास झाडाझडती सुरू केल्याचे पाहून अनधिकृत कृत्यातील ‘सावज’ पोलिसांच्या गळाला लागल्याची चर्चा लॉजच्या परिसरात सुरू होती़ संबंधितांवर कारवाई होणार, अशी अपेक्षाही होती़ मात्र, पोलीस रिकाम्या हातांनी परत आल्याने सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला़ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात लॉजची तपासणी केल्याची नोंद आहे़ (प्रतिनिधी)\
आयुर्वेदिक महाविद्यालय समोरच हा लॉज असून, यापूर्वीही पोलिसांनी काहीवेळा झाडाझडती केली आहे़ वारंवार संशयास्पद माहिती मिळत असतानाही धडक कारवाई का होत नाही ? हा प्रश्न समोर येत आहे़ या लॉजमधून तळीरामांसह इतर काही अक्षेपार्ह कृत्यांमुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही हैराण झाले आहेत़
म्हणे..तपासणीसाठी गेले होते पथक
४लॉजवरील कारवाईबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी़एम़शेख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहरातील सर्वच लॉज मालक, व्यवस्थापक यांना रजिस्टरवरील नोंदीसह इतर आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत़ कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे़ प्रारंभी सूचना देवून त्यानंतर अचानक तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे़

Web Title: Lodge of trees from the Lodge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.