जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेस शेतकऱ्यांनी ठोकले कुलुप
By Admin | Updated: July 11, 2017 15:45 IST2017-07-11T15:45:10+5:302017-07-11T15:45:10+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कर्मचारी नसल्याने कामात होत असलेल्या दिरंगाईने संतप्त शेतकऱ्यांनी कुलुप ठोकले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेस शेतकऱ्यांनी ठोकले कुलुप
ऑनलाईन लोकमत
परभणी : सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कर्मचारी नसल्याने कामात होत असलेल्या दिरंगाईने संतप्त शेतकऱ्यांनी कुलुप ठोकले.
मागील काही दिवसांपासून वडगाव येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कर्मचारी नसल्यामुळे तेथे कामकाज नियमित होत नाही. छोट्या छोट्या कामासाठी बँकेसमोर ताटकळत राहावे लागते. शेतीच्या कामात असा वेळ जाऊन कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज बँकेस कुलुप ठोकले.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासुन वडगाव शाखेत कर्मचारी नसल्याने या शाखेचा कारभार पाहण्यासाठी हरंगुळ येथील कर्मचाऱ्याला तात्पुरता कार्यभार दिला होता. पण सोमवार पासुन वडगाव शाखेत कुठलेच कामकाज होत नव्हते, आरटीजीएस हि बंद होते यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या दिवसात पैसै उपलब्ध होत नव्हते.