शाहुनगरच्या शाळेस लागले कुलूप

By Admin | Updated: September 12, 2014 00:24 IST2014-09-11T23:57:30+5:302014-09-12T00:24:03+5:30

रवींद्र लोखंडे , पारध भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील शाहुनगर भागातील जि. प. प्राथमिक शाळेस जिल्हा परिषद प्रशासनाने १४ आॅगस्टपासून गावातील दुसऱ्या

Locked in Shahunagar School | शाहुनगरच्या शाळेस लागले कुलूप

शाहुनगरच्या शाळेस लागले कुलूप


रवींद्र लोखंडे , पारध
भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील शाहुनगर भागातील जि. प. प्राथमिक शाळेस जिल्हा परिषद प्रशासनाने १४ आॅगस्टपासून गावातील दुसऱ्या जि. प. शाळेत विलिनिकरण करीत कुलूप ठोकले आहे.
दरम्यान कोणतीही सूचना न देता या शाळेचे विलिनिकरण करण्यात आल्याने पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविणेच बंद केले आहे. जोपर्यंत या ठिकाणी शाळा पूर्ववत सुरू होणार नाही तो पर्यंत शाळेत मुलांना पाठविले जाणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
शाहुनगर वस्तीपासून अवघडराव सावंगी गाव एक ते दीड कि़ मी. अंतरावर आहे. जिल्हा प्रशासनाने १९९७ साली या ठिकाणी प्राथमिक शाळेची स्थापना केली. तेव्हापासून येथे शाळा सुरू होती. पुढे काही वर्षांनी सर्वशिक्षा अभियानातंर्गत शाहुनगर येथे शाळेची पक्की इमारत बांधण्यात आली.
या शाळेत १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. एकूण ८० विद्यार्थी शाळेत आहेत. यासाठी तीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती.
मात्र अवघडराव सावंगी व शााहुनगर एकच असल्याने प्रशासनाने शाहुनगरची शाळा अवघडराव सावंगीच्या शाळेत विलनिकरण करण्याचा निर्णय घेतला आणि १४ आॅगस्ट पासूनच त्याची अमंलबजावणी केली.
शाळेतील विद्यार्थी या दुसऱ्या शाळेत जाण्यास तयार नाहीत. पालकांनी मुलांना सुमारे एक कि़ मी. अंंतरावर असलेल्या या शाळेत पाठविण्यास नकार दिलेला आहे.
ग्रामपंचायतनेही १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभा घेवून शाळा विलनीकरणास विरोध असल्याचा ठराव घेतला. शाळा याच ठिकाणी भरविण्याची मागणी केली. मात्र महिना उलटला तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शाळेतील ८० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शाळेसाठी इमारत व सर्व सुविधा
शाहुनगर जि. प. प्राथमिक शाळेसाठी सर्वशिक्षा अभियानातंर्गत इमारत बांधण्यात आली. ती सध्या चांगल्या स्थितीत आहे. शाळेत असलेले तीन शिक्षक हे इमाने इतबारे अध्यापनााचे कार्यकरीत आहे. शाळेची शैक्षणीक गुणवत्ताही चांगली आहे. शाळेत जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोयी सुविधा उलब्ध करून देण्यात आल्या होत्या. असे असतानाही ही शाळा अचानकपणे गावातील दुसऱ्या शाळेत वर्ग केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
या बाबत ग्रामपंचायतनेही ठराव घेवून शाळा दुसऱ्या शाळेत विलनिकरण करण्यास तीव्र विरोध केला. ठरावाच्या प्रतीसह एक निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. या शाळेचे विलिनिकरण केल्याने शाळेत असलेल्या तीन्ही शिक्षकांच्या जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या तालुक्यात बदल्या केल्या.
शाळेच्या विलनीकरणाचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा. व शिक्षकाच्या केलेल्या बदल्या रद्द करून शाळा पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी ग्रामस्थांनी व पालकांनी केली आहे. शाहुनगरची शाळा १ ली ते ४ थी पर्यंत आहे.
शाळेत असलेल्या लहान मुलांना विलनीकरण केलेल्या गावातील दुसऱ्या शाळेत जाण्यास एक ते दीड कि़ मी.चे अंतर पायी गाठून जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतेय. म्हणून मागील एक महिन्यापासून विद्यार्थी दुसऱ्या स्थलांतरीत शाळेत गेलेच नाही. तेव्हा पासून शाळा बंद असून इमारत धुळखात पडून आहे.
शाळेत असलेल्या लहान मुलांना विलनीकरण केलेल्या गावातील दुसऱ्या शाळेत जाण्यास एक ते दीड कि़ मी.चे अंतर पायी गाठून जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतेय. म्हणून मागील एक महिन्यापासून विद्यार्थी दुसऱ्या स्थालांतरीत शाळेत गेलच नाही. तेव्हा पासून शाळा बंद. इमारत धुळखात पडून आहे.

Web Title: Locked in Shahunagar School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.