सहा दिवसानंतर उघडले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:34 IST2017-10-06T00:34:17+5:302017-10-06T00:34:17+5:30
तीन शिक्षकांच्या नियुक्तीनंतर २८ सप्टेंबरपासून बंद असलेली मानधनी येथील जि़प़ शाळा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली़

सहा दिवसानंतर उघडले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : तीन शिक्षकांच्या नियुक्तीनंतर २८ सप्टेंबरपासून बंद असलेली मानधनी येथील जि़प़ शाळा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली़
मानधनी जि़प़ शाळा एकाच शिक्षकावर चालत होती़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते़ शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले होते़ पं़स़ उपसभापती विजय खिस्ते यांनी शिक्षण विभागाशी संपर्क केला़ त्यानंतर या शाळेवर तीन शिक्षकांची नियुक्ती केली़ त्यामुळे ३ आॅक्टोबर रोजी शाळा उघडण्यात आली़ यावेळी गटशिक्षणाधिकारी रणखांब, उपसभापती विजय खिस्ते, पं़स़ सदस्य मुंजाभाऊ तळेकर, गणेशराव इलग, उद्धवराव कुटे आदींची उपस्थिती होती़