शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पात्र असूनही चार वर्षांपासून कर्जमाफी का लटकली? शेतकऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांना विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:08 IST

मागील चार वर्षापासून सतत सरकारी कार्यालयाच्या खेटा मारत असूनही का कर्जमाफी झाली नाही अशी विचारणा या शेतकऱ्यांनी केली आहे. 

फुलंब्री : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनामध्ये कर्जमाफीस पात्र असूनही आमचे कर्ज माफ झाले नाही,  असा सवाल करीत तालुक्यातील पिरबावडा येथील सात शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे . मागील चार वर्षापासून सतत सरकारी कार्यालयाच्या खेटा मारत असूनही का कर्जमाफी झाली नाही अशी विचारणा या शेतकऱ्यांनी केली आहे. 

फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा येथील शेतकरी दिनकर विश्वनाथ  काळे ,दत्तू नामदेव काळे, कारभारी कडूबा काळे, प्रकाश मोहनाजी बकाल, उत्तम विश्वनाथ काळे, ठगनाबाई तातेराव बोकील, नवनाथ कोंडीबा मीसाळ यांनी २०१९ मध्ये महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजना मध्ये कर्ज माफी व्हावी म्हणून अर्ज दाखल केला होता.  

१४ ऑक्टोबर २०२० ला सहायक निबंधक यांनी पत्र पाठवून तुमचे कर्ज माफ झालेले आहे, याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये आपले नाव येईल असे कळविले होते. मात्र, शेतकऱ्यांची कर्जमाफी काही झाली नाही. तेव्हापासून सदर शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाच्या खेटा मारत आहेत. पण त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही. दरम्यान, ३ नोव्हेंबरला सातही शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री धनंजय मुंढे यांना पत्र पाठवून आम्ही कर्ज माफीत पात्र ठरवून ही आमचे कर्ज का माफ झाले नाही अशी विचारणा केली. तसेच याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. 

१३ ऑगस्ट २०१८ मध्ये शेतीकरीता ९५ हजार रुपये पिक कर्ज घेतले होते. २०१९ च्या  कर्जमाफीमध्ये पात्र ठरलो असे पत्र देखील मला मिळाले. पण कर्ज माफ  झालेले नाही. या करिता सतत शासन दरबारी चकरा मारत आहे.  पण अजूनतरी मदत मिळाली नाही. आज रोजी माझ्याकडे १ लाख ३४ हजार रुपये असल्याचे दाखविण्यात आले व चार महिन्यापूर्वी बँकेने माझे खाते गोठवले आहे, अशी माहिती शेतकरी कारभारी कडूबा मिसाळ यांनी दिली

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद