२८ कर्मचाऱ्यांवर भार
By Admin | Updated: July 10, 2014 01:02 IST2014-07-10T00:33:00+5:302014-07-10T01:02:38+5:30
गंगाराम आढाव , जालना शहर वाहतूक पोलिस शाखेस साडेतीन-चार वर्षापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा मिळाला खरा. परंतु अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी रिक्त पदांमुळे सक्षम होईनाशी झाली आहे.

२८ कर्मचाऱ्यांवर भार
गंगाराम आढाव , जालना
शहर वाहतूक पोलिस शाखेस गेल्या साडेतीन-चार वर्षापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा मिळाला खरा. परंतु अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी रिक्त पदांमुळे वाहतूक शाखा सक्षम होईनाशी झाली आहे. पूर्वी प्रमाणेच या यंत्रणेचे दैनंदिन कामकाज पूर्णत: कोलमडलेले आहे. शाखा सक्षम बनवावी व रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरासह जिल्ह्यातील रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून गृहखात्याने शहर वाहतूक पोलिस यंत्रणेस जिल्हा शाखेचा दर्जा बहाल केला. साडेतीन ते चार वर्षांपूर्वी या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. पाठोपाठ कारवाई केली. परिणामी शहर वाहतूक शाखेस जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा बहाल झाला. दुर्दैवाने या शाखेचा दर्जा वाढवून सुद्धा या यंत्रणेच्या कामकाजात काडीचीही सुधारणा झाली नाही.
गेल्या साडेतीन चार वर्षांपासून शहरासह जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांची अपुरी संख्याच त्यास कारणीभूत आहे. वास्तविकता या शाखेद्वारे जिल्हा शाखेचा दर्जा मिळाल्यानंतर दैनंदिन कामकाजात सुधारणा होईल असे अपेक्षित होते, दुर्दैवाने यंत्रणेत अधिकारी कर्मचाऱ्यांची बहुतांशी पदे रिक्त आहेत. त्यामुळेच या यंत्रणेंतर्गत आहे त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवरच शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा मोठा बोजा आहे. त्यामुळेच वाहतूक यंत्रणा सुरळीत होईनासी अशी झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग जातात. औरंगाबाद ते जालना पुढे जिंतूर या राज्यमार्गासह जाफराबाद, भोकरदन ते जालना, जालना ते अंबड, पुढे शहागड - बीड, भोकरदन ते सिल्लोड पुढे जळगाव तसेच अन्य महत्त्वपूर्ण मार्गावरुन वाहतुकीची मोठी वर्दळ आहे. दुर्दैवाने त्या तुलनेत शहरांतर्गत तसेच जिल्ह्यातील वाहतुकीस कोणतीही शिस्त नाही. हे वास्तव आहे. त्यामुळेच रस्ते वाहतूक सुरळीत होण्याकरिता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती गरजेची आहे. नूतन पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी वाहतूक यंत्रणेस सर्वार्थाने सक्षम बनावे म्हणून सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१०० पोलिसांची आवश्यकता
येथील जिल्हा वाहतूक शाखेत ६८ पदे मंजूर आहेत. पोलिस निरीक्षकांचे एक पद भरलेले आहे. फौजदारासह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे भरल्या जावीत म्हणून पोलिस यंत्रणेकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.
शहरातील गांधी चमन, शिवाजी पुतळा, मंठा चौफुली, पाणीवेस, सराफा बाजार, कॉलेज रोड, कडबी मंडी, विशाल कॉर्नर आदी भागात वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून २८ बीट आहेत. एका बीटमध्ये दोन कर्मचारी अपेक्षित आहे. परंतु या २८ बीटचे कामकाज पाहण्याकरिता ५६ कर्मचाऱ्यांची गरज आहे. दर आठवड्यास रजा व सुट्यांमुळेच बीटकडे लक्ष देणे शक्त होत नाही.
अपुरा कर्मचारी वर्ग असताना सुद्धा एक जानेवारी ते ३० जून या दरम्यान, सात हजार केसेस केल्या. त्याद्वारे २० लाख रुपयांचा दंड वसूल केला. या व्यतिरिक्त सावरकर चौक, बाजार चौक, फूलबाजार, सराफा आदी ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहिमेत सहभाग नोंदविला.