शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतिगृहाच्या जेवणात पाल; ४ दिवसांनी कंत्राटदारावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:34 IST

सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर घटनेच्या चार दिवसांनी प्रभारी गृहप्रमुख आतिष ससाणे यांच्या तक्रारीवरून कंत्राटदार डी. एम. एंटरप्रायजेसवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात सायंकाळच्या जेवणात पाल निघाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर घटनेच्या चार दिवसांनी प्रभारी गृहप्रमुख आतिष ससाणे यांच्या तक्रारीवरून मेसचा कंत्राटदार डी. एम. एंटरप्रायजेसचा योगीराज नागनाथअप्पा गौरशट्टे याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे कंत्राट मुंबईस्थित डी. एम. इंटरप्रायजेस ई गव्हर्नन्स सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीकडे आहे. कंपनीचा प्रतिनिधी योगीराज गौरशेट्टेला घडलेल्या प्रकारासाठी जबाबदार धरत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बीएनएस २७५ (अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री), १२५ (इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती) व २३८ (अपराध्याला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करणे किंवा खोटे बोलणे) या कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?डाॅ. बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांच्या वसतिगृह संकुलात चार युनिट आहेत. प्रत्येक युनिट हे २५० विद्यार्थी क्षमतेचे आहे. युनिट नंबर १ मधील विद्यार्थी मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी मेसमध्ये गेले. ८० टक्के विद्यार्थ्यांचे जेवण झाले होते. उर्वरित २० टक्के विद्यार्थी जेवत होते. तेव्हा भाजी घेत असताना एकाच्या पळीत (मोठा चमचा) शिजलेली पाल आली. हे पाहताच जेवणासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांत खळबळ उडाली; काहींनी उलट्या केल्या, तर अनेक विद्यार्थी मेस सोडून बाहेर पडले. काही विद्यार्थ्यांनी गृहपाल धनेधर व वर्शीळ यांना फोन केला, तर काहींनी चक्क सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांनाच वसतिगृहात घडलेला प्रकार सांगितला. शिंदे तातडीने वसतिगृहात दाखल झाले. तेव्हा विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांना घेराव घातला. त्यानंतर मळमळ झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच दवाखान्यात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले व त्यांना परत पाठविले.

English
हिंदी सारांश
Web Title : Lizard found in hostel food in Chhatrapati Sambhajinagar; contractor booked.

Web Summary : A lizard was found in the food at Dr. Babasaheb Ambedkar hostel in Chhatrapati Sambhajinagar. Following student protests, a case was filed against the mess contractor, Yogi Raj Gorshette, four days later for endangering student safety and tampering with evidence.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी