लायन्सतर्फे नैसर्गिक ऊर्जा जनजागृतीपर रॅली
By Admin | Updated: September 11, 2014 01:10 IST2014-09-11T00:48:01+5:302014-09-11T01:10:34+5:30
औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद सिडकोतर्फे शनिवारी सकाळी ७ वाजता सिडको चौकातून नैसर्गिक ऊर्जा स्रोत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

लायन्सतर्फे नैसर्गिक ऊर्जा जनजागृतीपर रॅली
औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद सिडकोतर्फे शनिवारी सकाळी ७ वाजता सिडको चौकातून नैसर्गिक ऊर्जा स्रोत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
रॅलीला पोलीस उपायुक्त वसंतराव परदेशी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅली आकाशवाणी, मोंढानाका चौकमार्गे क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जित करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून एमजेएफ एम.के. अग्रवाल, एमजेएफ राजेश राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी महावीर पाटणी, तनसुख झांबड, नवल मालू, संदीप मालू, विशाल लदनिया, रवी खिंवसरा, भावेश पटेल, मनीष महाजन, शांतीलाल छापरवाल यांची उपस्थिती होती. रॅलीमध्ये औरंगाबाद पब्लिक स्कूल, रशिदा प्राथमिक उर्दू हायस्कूल, महाराष्ट्र कर्णबधिर हायस्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
नैसगिक ऊर्जेचा वापर करा, झाडे लावा, झाडे जगवा, शहर आणि परिसर स्वच्छ ठेवा आदी संदेश दिले.
शिक्षक दिनानिमित्त लायन्सतर्फे रेजिमेंटल स्कूलमध्ये प्रांतपाल कमल मानसिंगका यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
राहुल औसेकर, रामनारायण मंत्री, एन.जी. कारखाने, सुहास कुलकर्णी, सुभाष चांदणे, शिवाजी झिरपे, आशिष पाल, शिवाजी छाबडा, वर्षा औसेकर, जयश्री औसेकर आदींनी परिश्रम घेतले.
शिक्षकांचा सन्मान
आदर्श शिक्षक म्हणून मीना देसले, सुधा कुलकर्णी, दिगंबर बंगाळे, राकेश खैरनार, आनंद पाटील आदींना पुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.