घरकुल योजनेतील १०१ लाभार्थ्यांची यादी जाहीर
By Admin | Updated: September 12, 2014 00:08 IST2014-09-11T23:41:26+5:302014-09-12T00:08:01+5:30
परभणी : रमाई घरकुल योजनेसाठी त्रुटीची पूर्तता केलेल्या दारिद्र्य रेषेखालील १०१ लाभार्थ्यांची यादी जाहीर झाल्याची माहिती महापौर देशमुख यांनी दिली.

घरकुल योजनेतील १०१ लाभार्थ्यांची यादी जाहीर
परभणी : रमाई घरकुल योजनेसाठी त्रुटीची पूर्तता केलेल्या दारिद्र्य रेषेखालील १०१ लाभार्थ्यांची यादी जाहीर झाल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.
अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील रमाई घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु असून त्यासाठी शासनाकडून १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून ५७८ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच त्रुटीमधील ज्या दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांनी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करुन दिले आहेत, अशा १०१ लाभार्थ्यांची निवड रमाई घरकुल योजनेसाठी केली आहे. या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर बांधकामाच्या टप्प्यानुसार उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सध्या प्रथम टप्पा अनुदान प्रति लाभार्थी २० हजार रुपये या प्रमाणे २० लाख २० हजार रुपये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. निवड झालेल्या १०१ लाभार्थ्यांनी नगर अभियंता विभाग यांच्याशी संपर्क साधून कामे सुरु करावीत, असे आवाहन महापौर प्रताप देशमुख, आयुक्त अभय महाजन, उपमहापौर सज्जुलाला, सभापती विजय जामकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, गटनेते अतुल सरोदे, दिलीप ठाकूर, समाजकल्याण सभापती आशाताई भीमराव वायवळ, उपसभापती सचिन कांबळे, उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, प्रकल्प अधिकारी शेख अकबर, नगरअभियंता रमेश वाघमारे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)