लिक्विड आॅक्सिजनची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:31 IST2017-10-03T00:31:35+5:302017-10-03T00:31:35+5:30

घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने अखेर तयारी केली आहे. त्यामुळे सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवताना निर्माण होणारे धोके कायमस्वरूपी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.

Liquid Oxygen Preparation | लिक्विड आॅक्सिजनची तयारी

लिक्विड आॅक्सिजनची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने अखेर तयारी केली आहे. त्यामुळे सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवताना निर्माण होणारे धोके कायमस्वरूपी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.
‘घाटी रुग्णालय आॅक्सिन सिलिंडरवर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून घाटीतील परिस्थिती समोर आणली. घाटी रुग्णालयात अत्याधुनिक आॅक्सिजन यंत्रणा (सेंट्रल आॅक्सिजन) बसविण्यात आली आहे; परंतु ही यंत्रणा अवघ्या काही वॉर्डांपुरती मर्यादित आहे. अनेक वॉर्डांत रुग्णास आॅक्सिजनची आवश्यकता भासल्यावर धावपळ करून आॅक्सिजन सिलिंडर लावला जातो. बालकक्षही सिलिंडरच्या जोरावर सुरू आहे. अनेकदा सिलिंडर पोहोचण्यास विलंब होतो. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा धोका नाकारता येत नाही.
घाटीतील मेडिसिन विभागात सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम आहे. येथे एका टँकमधून अतिदक्षता व आयसीसीयू, ‘एमआयसीयू’ला आॅक्सिजन पुरवठा केला जातो. सर्जिकल इमारतीमधील आॅपरेशन थिएटरमध्ये आॅक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक टँक आहे. या दोन्ही टँकमध्ये लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा केला जातो. तेथून पाइपद्वारे रुग्णांना आॅक्सिजन पुरविला जातो. इतर ठिकाणी मात्र जम्बो सिलिंडर लावून पाइपद्वारे आॅक्सिजन दिले जाते. यामुळे वारंवार सिलिंडर काढून लावण्याची कसरत कर्मचाºयांना करावी लागते. थेट लिक्विड आॅक्सिजनच्या टँकमधून पुरवठा झाल्यास ही कसरत कमी होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांकडून व्यक्त होत होती. अखेर जागे झालेल्या घाटी प्रशासनाने त्यासाठी नियोजन केले आहे. लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी दिल्ली येथील एका पथकाने गुरुवारी घाटीत पाहणी केली. लवकरच हे काम होईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

Web Title: Liquid Oxygen Preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.