शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

लिप फास्टनर, सिद्दीकी संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:06 PM

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या एमजीएम टी-२0 क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर व इक्बाल सिद्दीकी फॅन क्लब संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. इंद्रजित उढाण व शेख मुकीम हे दोघे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या एमजीएम टी-२0 क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर व इक्बाल सिद्दीकी फॅन क्लब संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. इंद्रजित उढाण व शेख मुकीम हे दोघे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.सकाळच्या सत्रात नेरळकर अकॅडमीविरुद्ध लिप फास्टनर संघाने प्रथम फलंदाजी करताना १४४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून इंद्रजित उढाण याने ३ षटकार व ४ चौकारांसह ६४ धावा केल्या. मदन राजू व राहुल पाटील यांनी अनुक्रमे नाबाद १७ व १५ धावा केल्या. नेरळकर अकॅडमीकडून कौस्तुभ केकाळे व कृष्णा पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात नेरळकर अकॅडमी संघाकडून मुकुल जाजूने एकाकी झुंज देत ३८ धावा केल्या. सोहेल पाटीलने २८, निहार वाकडीकरने १७ व आयुष पटेलने १२ धावांचे योगदान दिले. लिप फास्टनरकडून आशिष सूर्यवंशीने १२ धावांत ४ गडी बाद केले. राहुल पाटीलने ३ बळी घेतले.दुपारच्या सत्रात अश्वमेध संघाविरुद्ध इक्बाल फॅन क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८२ धावा ठोकल्या. त्यंच्याकडून शेख मुकीमने चौफेर टोलेबाजी करताना ४ षटकार व ८ चौकारांसह ९२ धावांची वादळी खेळी केली. अश्वमेध नेवा संघाकडून संतोष फुलमाली याने २ गडी बाद केले. बालाजी काळेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अश्वमेध संघ ८५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून किशोर राऊतने १६, सचिन कांबळेने १५ व सुनील तांबेने १२ धावा केल्या. उद्या, गुरुवारी सकाळी ८.१५ वाजता अश्वमेध सी.सी. वि. लकी क्रिकेट क्लब आणि दुपारी १२.१५ वाजता फ्युचर सी.सी. मुंबई वि. श्रेयस क्रिकेट क्लब यांच्यात लढत होणार आहे. आज झालेल्या सामन्यात उदय बक्षी, गंगाधर शेवाळे, रफिउद्दीन नेहरी यांनी पंचांची भूमिका बजावली. गुणलेखन राजेश भिंगारे यांनी केले.