लायन्स क्लब इंटरनॅशनलचा ‘सिंहनाद’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:00 IST2017-08-07T00:00:07+5:302017-08-07T00:00:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या नवनियुक्त पदाधिकाºयांचा शपथग्रहण अर्थात सिंहनाद सोहळा उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या ...

लायन्स क्लब इंटरनॅशनलचा ‘सिंहनाद’ उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या नवनियुक्त पदाधिकाºयांचा शपथग्रहण अर्थात सिंहनाद सोहळा उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या इंटरनॅशनल संचालिका लायन्स अरुणा ओस्वाल यांनी औरंगाबाद प्रांताच्या नवनियुक्त पदाधिकाºयांना सेवा करण्याची शपथ दिली. यात प्रांतपाल, प्रथम उपप्रांतपाल, द्वितीय उपप्रांतपाल, कोषाध्यक्ष, सचिव, नवनियुक्त सदस्य आदींचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात रविवारी हा सोहळा पार पडला. मंचावर अरुणा ओस्वाल, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, कॅप्टन शालिनी सिंग, सिनेकलावंत विशाल जेठवा, नवनियुक्त प्रांतपाल लॉयन संदीप मालू, प्रथम उपप्रांतपाल डॉ. संजय वोरा, द्वितीय उपप्रांतपाल नितीन बंग, सचिव अमोल गंभीर, कोषाध्यक्ष सुहास लंके, समन्वयक पारस ओस्तवाल, डॉ.सुरूची मालू, मावळते प्रांतपाल अॅड. प्रवीण अगरवाल, प्रवीण काला, पुरुषोत्तम जयपुरिया, शिरीष सिसोदिया, बिना चावला, डॉ. रामेश्वर भारुका, सुरेश करवा, एन. जी. कारखाने आदी उपस्थित होते. यावेळी अरुणा ओस्वाल यांनी देशातील १६ प्रांतांमध्ये चालणाºया कार्याचा आढावा घेत नवनियुक्त पदाधिकाºयांना शपथ दिली.
लायन्स क्लबच्या नवीन सदस्यांना डॉ. अशोक बावस्कर यांनी शपथ दिली, तर नवनियुक्त प्रांतपाल डॉ. संदीप मालू यांनी सर्वांच्या सहकार्याने कार्य करायचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला माजी प्रांतपाल गोपाळराव पाटील, मन्मथ भातंबरे, तनसुख झांबड, महावीर पाटणी, राजेश राऊत, के. सी.पारख, जयेश ठक्कर, एम. के. अगरवाल, रवींद्र कुलकर्णी यांच्यासह सचिव डॉ. सतीश सुराणा, जयकुमार थानवी, जितेंद्र महाजन, अनुप धानुका, मीना सिन्हा, सतीश अगरवाल आदी उपस्थित होते.