सुख, शांतीसाठी ‘दुवा’
By Admin | Updated: June 27, 2017 00:42 IST2017-06-27T00:42:14+5:302017-06-27T00:42:58+5:30
बीड : रविवारी चंद्रदर्शनानंतर रात्री मीना बाजारासह शहरातील बाजारपेठ फुलली होती

सुख, शांतीसाठी ‘दुवा’
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रविवारी चंद्रदर्शनानंतर रात्री मीना बाजारासह शहरातील बाजारपेठ फुलली होती. सोमवारी सकाळी ईदगाह बालेपीर, मर्कस मस्जिद, तकिया मस्जिद, महेबुबिया मस्जिद, कारंजा मस्जिद, जामा मस्जिद, ईदगाह इस्लामपुरा, मदरसा, मजाहेर उलूम मोमीनपुरासह सर्व मस्जिदमध्ये ईद- उल- फित्रची नमाज अदा केली. या वेळी शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. या वेळी धर्मगुरुंनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हिंंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी आ. जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, माजी आमदार राजेंद्र जगताप, डॉ. योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे, पप्पू कागदे, राजेंद्र मस्के, प्रा. सुशीला मोराळे उपस्थित होते.
गेवराईत नेत्यांसह
अधिकाऱ्यांची उपस्थिती
गेवराई येथे सोमवारी सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आ.अमरसिंह पंडित, आ. लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, माजी मंत्री बदामराव पंडित, जि. प. चे सभापती युधाजित पंडित, जि. प. चे अध्यक्ष विजयसिंह पंडित, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, सुरेश सांगळे, वरपे, न.प.चे अरूण जोशी आदी उपस्थित होते. तसेच या मैदानावर ठाण्याच्या वतीने निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी आलेल्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
आष्टीत उत्साह
येथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सकाळी नमाज अदा केली. त्यानंतर आ.भीमराव धोंडे, माजी मंत्री सुरेश धस, मा. आ. साहेबराव दरेकर, जि.प. सदस्य बाळासाहेब आजबे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, सतीश शिंदे, नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, साहेबराव म्हस्के, राम खाडे आदी उपस्थित होते.
लोखंडी सावरगावमध्ये मार्गदर्शन
येथील गैबन शहावली ईदगाह मैदानावर ईद- उल - फित्रची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना अलीम कुरेशी यांनी मार्गदर्शन केले. शुभेच्छा देण्यासाठी सरपंच राजपाल देशमुख, सिद्धार्थ बनसोडे, मंडळ अधिकारी यू. व्ही. कराड, सचिन माचवे, अतुल शेळके, आर. के. जाधवसह हिंदू बांधव उपस्थित होते.
घाटनांदूर येथे ईद उल फित्र उत्साहात
येथील ईदगाह मैदानाच्या प्रांगणात सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. त्यानंतर जि. प. सदस्य शिवाजी सिरसाट, बाजार समितीचे व्हाईस चेअरमन गोविंद देशमुख, ज्ञानोबा जाधव, बाळासाहेब देशमुख, बालाजी राजमाने, उपसरपंच प्रा सुरेश जाधव, प्रदीप जाधव, लक्ष्मण नाईक, प्रभु पुरी, बन्सी जाधव, संजय रानभरे आदींनी शुभेच्छा दिल्या.