रस्ता कामामुळे तुटली नागरिकांची ‘लिंक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:02 IST2017-08-30T01:02:49+5:302017-08-30T01:02:49+5:30
महानुभाव आश्रम ते लिंक रोड या पैठण रोडवरील दोन कि़मी.च्या कामामुळे मंगळवारी नागरिकांची शहराशी व औद्योगिक वसाहतीकडे जाणाºया उद्योजकांची, शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची ‘लिंक’ महिन्यापासून तुटली आहे

रस्ता कामामुळे तुटली नागरिकांची ‘लिंक’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानुभाव आश्रम ते लिंक रोड या पैठण रोडवरील दोन कि़मी.च्या कामामुळे मंगळवारी नागरिकांची शहराशी व औद्योगिक वसाहतीकडे जाणाºया उद्योजकांची, शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची ‘लिंक’ महिन्यापासून तुटली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे, तर महापालिका त्या रस्त्यात येणाºया जल व ड्रेनेज वाहिन्यांची तोडफोड होत असतानाही त्याकडे बघ्याची भूमिका घेत आहे. नरकयातनांचा अनुभव त्या भागातून ये-जा करणाºया नागरिकांना सध्या येतो आहे.
मुख्य रस्त्याच्या कामासाठी रस्ता खोदल्यामुळे ३ हजार विद्यार्थी आणि हजारो नागरिकांसाठी करण्यात आलेला पर्यायी रस्ता पूर्णत: चिखलमय झाल्यामुळे मंगळवारी नागरिक रस्त्यावर उतरले. नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्या घराकडे सकाळीच नागरिकांनी धाव घेतली, तर परिसरातील दोन्ही मोठ्या शाळांच्या शिक्षकांनी, तसेच महानुभाव आश्रममधील महाराजांनी त्यांच्याकडे चिखलमय रस्त्यामुळे होणारे हाल येऊन पाहण्याचे आव्हान दिले.
कंत्राटदार कंपनी जीएनआयने लिंक रोड ते महानुभाव आश्रम पोलीस चौकीपर्यंत दुसºया बाजूचा रस्ता खोदला. तो खोदताना जलवाहिनी, ड्रेनेज वाहिन्या दाबल्याशिवाय दोन शाळा व वसाहतींसाठी असलेला रस्ताही खोदून टाकला. पर्यायी रस्ता करून दिला, पण तो चिखलमय झाल्यामुळे वाहने चिखलात फसत आहेत. जीएनआयचे रवींद्र बिंद्रा यांनी परिस्थिती पाहता शाळा, नागरिकांसाठी दुसरा पर्यायी (रॅम्प) रस्ता करून दिला.