लिंगायत समाजाचा विराट मोर्चा
By Admin | Updated: July 16, 2014 00:13 IST2014-07-16T00:13:34+5:302014-07-16T00:13:34+5:30
उदगीर : लिंगायत समाजाच्या वतीने मंगळवारी येथील उपविभागीय कार्यालयावर वीरशैव समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा काढण्यात आला़

लिंगायत समाजाचा विराट मोर्चा
उदगीर : लिंगायत समाजाला भाषिक व अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा़ तसेच नोकरी, शिक्षणात आरक्षण मिळावे़ या मागणीसाठी लिंगायत समाजाच्या वतीने मंगळवारी येथील उपविभागीय कार्यालयावर वीरशैव समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा काढण्यात आला़
उदगीर येथे लिंगायत समाजाच्या वतीने लिंगायत समाजाला भाषिक व अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा, नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, लातूरच्या विमानतळास महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्यात यावे, मंगळवेढा (जि़मंगळवेढा) येथे महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारण्यात यावे, श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री मन्मथ स्वामींच्या स्मारकासाठी निधी मंजूर करावा, समाजातील सर्व पोट जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे़ या मोर्चाला तालुकाध्यक्ष चंद्रकांत वैैजापूरे यांच्यासह आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, चंद्रशेखर भोसले, प्रा़ मनोहर पटवारी, नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा़ नागनाथ निडवदे, बसवराज बागबंदे, तालुक्यातील लिंगायत समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती़
देवणी : लिंगायत समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी वीरशैैव सभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी सी़एम़बिरादार, चंद्रकांत पत्री, सतीष आष्टुरे, माधवराव धनुरे, मनोहर पटणे, वसंत डोंगरे, बंडप्पा कंटे, हणमंत लद्दे, राजकुमार जीवणे, वैैजनाथ आष्टुरे, भीम पाटील, मनोज पाटील, महादेव स्वामी, निलेश लांडगे, संतोष पाटील आदींची उपस्थिती होती़
शिरूर अनंतपाळ : लिंगायत समाजाचा विविध मागण्यांसाठी मंगळवारी किरण कोरे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी डॉ़ अरविंद भातांब्रे, विनोद धुमाळे, कैैलाश शिवणे, रतन शिवणे, गणेश धुमाळे, अमोल लोहारे, सचिन कवठाळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते़
अहमदपूर, जळकोटात आंदोलऩ़़
लिंगायत समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, बब्रुवान खंदाडे, माजी सभापती दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती चंद्रकांत मद्दे, साम महाजन, पंडितराव भुरे, शिवराज शेटकार, चंद्रशेखर देसाई, शिवानंद हेंगणे, राजकुमार मजगे, पांडू मिरकले, कमलाकर पाटील, ओम पुणे, वसंतराव शेटकार, निळकंठ पाटील, नगरसेवक अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, चंद्रकांत पुणे, महेश उटगे, बाबुराव बावचकर, काशिनाथ गाढवे, विनायक शेटकार, राम बेल्लाळे, उमाकांत कासनाळे, प्रा़ विश्वंभर स्वामी, केदार काडवादे आदींची उपस्थिती होती़
लिंगायत समाजाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी महेश धुळशेट्टे, नागनाथ धुळशेट्टे, रामेश्वर पेटकर, प्रकाश मरतुळे, शिवशंकर काळे, विजय कामशेट्टे, विकास देशमुख आदींची उपस्थिती होती़
चाकूर व निलंग्यात धरणे
लिंगायत समाजातील सर्व उपजातींना त्यांच्या प्रवर्गानुसार आरक्षण द्यावे़ या मागणीसह इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर, विलासराव पाटील, अॅड़ युवराज पाटील, बालाजी पाटील, प्रशांत बिबराळे, शांताबाई निला, गणेश फुले, बसवराज निला, चंद्रकांत स्वामी सुधाकर हमणे यांच्यासह लिंगायत समाजातील बांधवांची मोठी उपस्थिती होती़
लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी निलंगा तहसील कार्यालयासमोर ३ तास धरणे करण्यात आले़ यावेळी कोरणेश्वर महाराज, शिवाजीराव रेशमे, अशोकप्पा शेटकार, अमोल आर्य, संतोष शेटे, विजयकुमार कानडे, प्रकाश पटणे, संजय सोरडे, अॅड़ शंकरअप्पा माटोळे, अॅड़ दयानंद बिरादार, लिंबनप्पा बिरादार, अविनाश रेशमे आदी उपस्थित होते़