१९ रोजी बीदर येथे लिंगायत महारॅली

By Admin | Updated: July 17, 2017 00:32 IST2017-07-17T00:26:25+5:302017-07-17T00:32:09+5:30

नांदेड: लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्मास संविधानिक धर्म मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी १९ जुलै रोजी लिंगायत महारॅली काढण्यात येणार आहे़

Lingayat Maharali at Bidar on 19th | १९ रोजी बीदर येथे लिंगायत महारॅली

१९ रोजी बीदर येथे लिंगायत महारॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्मास संविधानिक धर्म मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी कर्नाटकाच्या बीदर येथे १९ जुलै रोजी लिंगायत महारॅली काढण्यात येणार आहे़ या महारॅलीस जिल्ह्यातून समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे़
१९८८ ते १९४१ पर्यंत सर्व मूळ कागदपत्रांवर लिंगायत या स्वतंत्र धर्माची नोंद आहे़, परंतु स्वातंत्र्यानंतर लिंगायत धर्माची मान्यता काढून घेण्यात आली़ इतर धर्मांनी ती पुन्हा मिळविली़ लिंगायतांना मान्यता न मिळाल्याने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय नुकसान झाले आहे़ बीदर येथे होणाऱ्या महारॅलीस राष्ट्रसंत डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज, डॉ़प़पू़बसवलिंग पट्टदेवरु, प़पूक़ोर्णेश्वर स्वामी, प़पू़ हुलसूरकर महास्वामी, प़पू़डॉ़ माते महादेवी यांच्यासह अनेक धर्मगुरुंची उपस्थिती राहणार आहे़, रॅलीस उपस्थित रहावे आवाहन बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़अविनाश भोसीकर, नागनाथ स्वामी, प्राचार्य आनंद कर्णे, पिंटूअप्पा बोंबले, राजू बोंबले, डॉ़व्यंकट कुऱ्हाडे, रत्नाकर कुऱ्हाडे, विठ्ठल लांडगे यांनी केले आहे़

Web Title: Lingayat Maharali at Bidar on 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.