लिंगायत समाजाचे धरणे
By Admin | Updated: July 16, 2014 00:48 IST2014-07-16T00:40:28+5:302014-07-16T00:48:33+5:30
नांदेड : महाराष्ट्र वीरशैव सभा शाखा नांदेडच्या पुढाकारातून लिंगायत संघर्ष समिती व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत परिषद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी सवलती
लिंगायत समाजाचे धरणे
नांदेड : महाराष्ट्र वीरशैव सभा शाखा नांदेडच्या पुढाकारातून लिंगायत संघर्ष समिती व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत परिषद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी सवलती मिळविणे, वीरशैव लिंगायत समाजास वेगळा धर्म समजून अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले़
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार वाणी समाजास ओबीसीच्या सवलती मिळतात़ परंतु रोटी-बेटी व्यवहार व रक्तनाते एकच असताना सुद्धा लिंगायत, वीरशैव, लिंगायत वाणी, लिंगडेर आदी पर्यायी वाचक शब्दांच्या जातीच्या रकान्यात उल्लेख असल्यामुळे बहुसंख्य लिंगायत समाज वंचित आहे़
त्यामुळे या सर्वांना वाणी संबोधून त्यांना ओबीसीच्या सवलती मिळवून देण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी आ़ ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ़ गंगाधरराव पटणे, माजी आ़ ईश्वरराव भोसीकर, हरिहरराव भोसीकर, माधवराव पांडागळे, माजी सभापती किशोर स्वामी, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे, सेना जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, जि़ प़ सदस्य संजय बेळगे, बचूराज देशमुख, अनिल पाटील खानापूरकर, नागनाथ पाटील सावळीकर, हनमंतराव मस्कले, माजी सभापती दिलीप कंदकुर्ते, खुशाल पाटील उमदरीकर, विश्वनाथ देशमुख, योगेश बुरांडे, राजन मिसाळे, बाबूराव देशमुख कौठेकर, डॉ़ नीळकंठ भोसीकर यांची उपस्थिती होती़
सूत्रसंचालन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश मारकोळे - पाटील यांनी केले़ (प्रतिनिधी)
पालकमंत्री डी़पी़सावंत यांनी धरणे आंदोलनास उपस्थित राहून बुधवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ मागून घेणार असल्याचे सांगितले़ तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकप्रतिनिधी व समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून आवश्यक तो बदल करुन हा विषय सोडविण्याचे आश्वासन दिले़ मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी श्री केदार जगदगुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला़