जिल्ह्यात फुलले कमळ...!
By Admin | Updated: October 20, 2014 00:31 IST2014-10-20T00:15:24+5:302014-10-20T00:31:53+5:30
संतोष धारासूरकर ,जालना गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: सफाया झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत भोकरदन, परतूर या दोन मतदार संघात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा तर बदनापुरात एकेकाळच्या मित्र

जिल्ह्यात फुलले कमळ...!
संतोष धारासूरकर ,जालना
गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: सफाया झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत भोकरदन, परतूर या दोन मतदार संघात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा तर बदनापुरात एकेकाळच्या मित्र पक्षाचा पराभव करीत पाचपैकी तीन जागा पटकावून संपूर्ण जिल्ह्यात कमळ फुलविले आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा वर्चस्व सिद्ध करणार का हा उत्कंठतेचा विषय होता. राज्यातील काँग्रेसजनां विरोधातील वातावरणात ओळखून या जिल्ह्यातील सत्तारुढ गटांतील दोन्ही पक्षांच्या मात्तबरांनी सर्व शक्तीनिशी निवडणुका लढविल्या. त्यात राजेश टोपे अपवाद अन्य कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलिया व चंद्रकांत दानवे या तिघा सत्तारुढ गटाच्या मात्तबरांनां सपशेल पराभावाचा सामना करावा लागला. या उलट भाजपाने परतूर व भोकरदन या दोन्हीही जागा पुन्हा खेचून आणल्या. पाठोपाठ बदनापूरचीही जागा पटकावून विरोधकांबरोबर मित्र पक्षांना चकित केले आहे. केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी भोकरदनची निवडणूक प्रतिष्ठेचीच होती. चिरंजीव संतोष दानवे यांच्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणास लावली. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी) यांच्यासह शिवसेनेचे रमेश गव्हाड यांचे आव्हान होते. परंतु दानवे कुटुंबियांनी जिवाचे रान करीत दोघा प्रतिस्पर्ध्यांना लोळविले. त्याद्वारे सलग तीनवेळा झालेल्या पराभावाचा वचपा काढला. परतूरमधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी तथा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या सुरेश जेथलिया यांचा पराभव केला. त्याद्वारे गेल्या निवडणुकीतील पराभावाचा वचपा काढला. येथून मनेसचे बाबासाहेब आकात, शिवसेनेचे सोमनाथ साखरे, राष्ट्रवादीेचे प्रा. राजेश सरकटे यांचा सफाया झाला. अपक्ष निवास चव्हाण यांनीही लक्षणीय मते मिळवून सर्वांना चकित केले.