शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या दोन मित्रांवर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 18:48 IST

फुलंब्री तालुक्यातील पिंप्री सताळा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन पक्क्या मित्र्यांचा असा अंत झाल्याने गावावर पसरली शोककळा पसरली.

फुलंब्री: तालुक्यातील पिंप्री सताळा परिसरात पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या दोन तरुणावर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृतू झाला. घटना आज म्हणजेच रविवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे, मृत्यू झालेले दोन्ही तरुण एकमेकांचे पक्के मित्र होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पिंप्री सताळा येथील रोहनसिंग विजयसिंग शिंदे(वय १५ ) व रवी जनार्दन कळसकर(वय २१) हे दोघे राविवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान गट १५१ मधील त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. काम सुरू असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक पावूस पडण्यास सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी दोघे जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली गेले. यावेळी अचानक त्या झाडावर वीज कोसळली, यात दोघाचा जागीच मृतू झाला. त्यांचे शव फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.दोघे पक्के मित्र या घटनेतील मयत विजयसिंग शिंदे व रवी कळसकर हे दोघे पक्के मित्र होते. दिवस उगवला की दोघेही सोबतच राहत असे. रविवारचा दिवस त्यांच्यासाठी वाईट ठरला. दोन्ही मित्र सोबतच जग सोडून गेल्याने गावात हळ हळ व्यक्त होत आहे. या घटनेतील रोहनसिंग शिंदे हा आळंद येथील शाळेत शिक्षण घेत होता, तो यंदा दहावीला गेला होता तर रवी कळसकर हा सद्य शिक्षण घेत नव्हता. रवी कळसकर हा आई -वडिलांना तीन बहिणीच्या पाठीवर एकटाच होता तर रोहनसिंग शिंदे याला एक बहिण व एक भाऊ आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादphulambri-acफुलंब्री