शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात दिव्यांची रोषणाई
By Admin | Updated: February 18, 2016 23:46 IST2016-02-18T23:37:52+5:302016-02-18T23:46:30+5:30
नांदेड : सार्वजनिक शिवजन्मोत्सव महिला समितीच्यावतीने गुरूवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिपोत्सवाचे आयोजन केले होते़

शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात दिव्यांची रोषणाई
नांदेड : सार्वजनिक शिवजन्मोत्सव महिला समितीच्यावतीने गुरूवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिपोत्सवाचे आयोजन केले होते़ यावेळी महिलांनी लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने पुतळा परिसर उजळला होता़
शिवजयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महापालिकेच्यावतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ दरम्यान, सार्वजनिक शिवजन्मोत्सव महिला समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत बहुजन समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यां दिपोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या़ प्रारंभी, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जिजाऊ वंदना घेण्यात आली़ यानंतर सहभागी शेकडो महिलांनी पुतळ्याच्या समोरील भागात दिवे प्रज्वलित करून शिवरायांना अभिवादन केले़ महिलांनी जय जिजाऊ़़़ जय शिवराय़़़ च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला़ या दिपोत्सवामध्ये समितीच्या अध्यक्षा सविता पावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ़रेखा पाटील चव्हाण, कृष्णा मंगनाळे, कल्पना पाटील डोंगळीकर, डॉ़ शुभांगी देवसरकर, डॉ़मनोरमा चव्हाण, डॉ़प्रतिमा पाटील, शिल्पा भोसले, जयश्री भायेगावकर, शोभा तरोडेकर, सुरेखा रावणगावकर, हेमलता शिंदे, ललिता शिंदे, वनिता देवसरकर, ज्योती देशमुख, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, ज्योती कुर्तडीकर, प्रतिक्षा आघाव, सावि चव्हाण, ज्योती सरसमकर, शेलगावकर, धर्माधिकारी यांनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)