शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:03 IST

नीरज पांडे यांच्या वेब सिरीजचे चित्रीकरण थेट छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर 

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बुधवारी अचानक ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे करण्यात आले. आश्चर्यचकित होऊ नका. विमानतळाचे नाव खरेखुरे बदललेली नाही. तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक नीरज पांडे यांच्या आगामी बंगाली भाषेतील वेब सिरीजचे चित्रीकरण विमानतळावर झाले आणि या चित्रीकरणात छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ हे कोलकाता येथील विमानतळ म्हणून दाखविण्यात आले. त्यासाठी विमानतळाचे नाव बदललेले पहायला मिळाले.

चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, जाहिरात आदींच्या चित्रीकरणात अनेकदा विमानतळावरील दृश्य महत्त्वाचे ठरते. आजघडीला मुंबईसह अनेक विमानतळांवर चित्रीकरणासाठी गर्दीसह अनेक अडचणी येतात. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून चित्रपट निर्माते पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरातील विमानतळाकडे वळत आहे.

चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी सकाळी विमानतळावर येणाऱ्या प्रवासी विमानतळाचे नाव वाचून काहीसे चकीत झाले. पण लगेच शूटिंग सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सकाळी ८ वाजेपासून सायंकाळपर्यंत बंगाली भाषेतील वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू होते.

‘खाकी : द बंगाल चॅप्टर’वेब सिरीजचे नाव आणि चित्रीकरणातील दृश्य गुपित ठेवण्यात आले. परंतु नीरज पांडे यांच्या ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’ या वेब सिरीजची घोषणा झाली. याच वेब सिरीजचे चित्रीकरण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी बंगाली अभिनेते, कलावंत विमानतळावर दाखल झाले होते. चित्रीकरणात कोलकाता विमानतळ म्हणून दाखविण्यात आले.

विमानतळावर चित्रीकरणासाठी कोण देते परवानगी?विमानतळावर चित्रीकरण करण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते.

विमानतळावर चित्रीकरणासाठी किती शुल्क ?विमानतळावर चित्रीकरण करण्यासाठी तासानुसार ही रक्कम आकारली जाते. हे शुल्क साधारणपणे तासाला ७० हजार ते ८० हजार रुपये इतके असतात.

विमानतळावर झालेले यापूर्वी चित्रीकरण- २२ जानेवारी २०२३ रोजी अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री ज्योतिका आणि अलाया एफ यांची भूमिका असलेल्या ‘श्री’ या चित्रपटाची शूटिंग झाली आहे.- २८ जुलै २०२१ राेजी चिकलठाणा विमानतळावर अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिस्पॅच’ चित्रपटाचे चित्रीकरण विमानतळावर झाले होते.

चित्रीकरणासाठी परवानगीडायरेक्टर नीरज पांडे यांच्या वेब सिरीजचे चित्रीकरण विमानतळावर करण्यात आले. चित्रीकरणासाठी ‘डीजीसीए’ आणि ‘बीसीएएस’ यांच्याकडून परवानगी दिली जाते. त्यानुसार चित्रीकरणासाठी दिवसभराची परवानगी होती.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनcinemaसिनेमा