दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना जीवन गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:02 IST2021-08-28T04:02:06+5:302021-08-28T04:02:06+5:30

ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रूजवणाऱ्या डॉ. पाथ्रीकर यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील एका क्रीडा शिक्षकास ‘आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात ...

Lifetime Achievement Award to Dattabhau Pathrikar | दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना जीवन गौरव पुरस्कार

दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना जीवन गौरव पुरस्कार

ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रूजवणाऱ्या डॉ. पाथ्रीकर यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील एका क्रीडा शिक्षकास ‘आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी अथॅलेटिक्स खेळाचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांचा विशेष गौरव केला जाणार असल्याची माहिती आयोजक औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी दिली.

आदर्श शिक्षक पुढील प्रमाणे : औरंगाबाद - स्मिता डबीर (पारगावकर), फुलंब्री - एकनाथ ढेके, वैजापूर - बाळासाहेब व्यवहारे, गंगापूर - प्रा. उदय तगारे, पैठण - नीलेश गायकवाड, खुलताबाद - कुरेशी मोहम्मद अख्तर, कन्नड - प्रवीण शिंदे, सोयगाव - संदीप चौधरी. याशिवाय तब्बल ८३ खेळांच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचादेखील गौरव करण्यात येणार आहे.

Web Title: Lifetime Achievement Award to Dattabhau Pathrikar