कोपरवेलच्या ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST2021-09-13T04:04:40+5:302021-09-13T04:04:40+5:30
नाचनवेल : जाण्या-येण्यासाठी पूल नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कोपरवेलचा बाह्यजगाशी संपर्क तुटून विद्यार्थी, रुग्ण व जेष्ठ नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा ...

कोपरवेलच्या ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
नाचनवेल : जाण्या-येण्यासाठी पूल नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कोपरवेलचा बाह्यजगाशी संपर्क तुटून विद्यार्थी, रुग्ण व जेष्ठ नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अंजनेचे पाणी थोडेसे कमी झाल्यावर नागरिकांनी सिमेंट बंधाऱ्याच्या भिंतीवर लोखंडी दरवाजे आडवे टाकून तात्पुरता मार्ग तयार केला; परंतु हा रस्ता अतिशय जोखमीचा असून येथून जातना जराही संतुलन बिघडले तर खोल पाण्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
येथूनच नाचनवेल येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याने एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील नागरिक गेल्या तीन पावसाळ्यांपासून या समस्येशी तोंड देत असून आता या ठिकाणी तातडीने मोठा पूल मंजूर न झाल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याच्या इशारा ग्रामस्थांकडून दिला जात आहे.
----------
फोटो : अंजना नदीच्या सिमेंट बंधाऱ्यावरून पैलतीरी जाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
120921\20210912_090044_1.jpg
कोपरवेल वासीयांना कोल्हापूरी बंधाऱ्यावरून असा मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.