नवविवाहितेने संपवली जीवनयात्रा

By Admin | Updated: November 6, 2014 01:36 IST2014-11-06T00:39:10+5:302014-11-06T01:36:34+5:30

बीड : लग्न होऊन तीन महिने उलटताच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी पेठ बीड भागामध्ये घडली.

Life span ended with newlyweds | नवविवाहितेने संपवली जीवनयात्रा

नवविवाहितेने संपवली जीवनयात्रा


बीड : लग्न होऊन तीन महिने उलटताच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी पेठ बीड भागामध्ये घडली.
स्वाती लहू मुने (वय २२, रा. चांदणी चौक, पेठ बीड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्यांचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आहे. तीन महिन्यापूर्वी स्वाती यांचा बीड येथील लहू मुने यांच्यासोबत विवाह झाला होता. मंगळवारी रात्री मुने कुटुंबियांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. पहाटे स्वाती यांनी पलंगावर उभे राहून लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप समोर आलेले नाही. संतोष आसाराम मुने यांच्या खबरीवरून पेठ बीड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाईकांचे जवाब घेण्यात येतील, असे सहायक निरीक्षक श्रीकांत हरगबाळ म्हणाले.
स्वाती मुने यांनी मंगळवारी रात्री पती लहू यांच्याकडे सुखी संसाराच्या गप्पा मारल्या होत्या. बाहेर जेवायला जायचेही ठरले होते. मात्र स्वाती यांनी सकाळी आत्महत्या केली. त्यामुळे ‘प्रॉमिस’ अधुरेच राहिले, अशी चर्चा होती. (प्रतिनिधी)

Web Title: Life span ended with newlyweds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.