शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: December 19, 2015 23:47 IST

उस्मानाबाद : अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़पीक़ुलकर्णी यांनी जन्मठेप व एक हजार रूपयांचा दंड ठोठावला़

उस्मानाबाद : अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़पीक़ुलकर्णी यांनी जन्मठेप व एक हजार रूपयांचा दंड ठोठावला़ ही घटना ५ जानेवारी २०१४ रोजी तेर (ता़उस्मानाबाद) येथे घडली होती़ याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दीपक पाटील-मेंढेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील अनिता मदनसिंग ठाकूर यांची मुलगी नेहा उर्फ पूजा हिचा १९ आॅक्टोबर २०१२ रोजी तेर (ता़उस्मानाबाद) येथील निलेश लक्ष्मीकांत व्यास याच्याशी नांदेड येथे विवाह झाला होता़ विवाहनंतर ९ महिने नेहा हिस चांगल्या पद्धतीने नांदविण्यात आले़ मात्र, निलेश याचे एका महिलेशी अनैतिक संबंध जुळले आणि त्या अनैतिक संबंधाला त्याची पत्नी नेहा ही विरोध करू लागली़ त्यामुळे निलेश व्यास याने ५ जानेवारी २०१४ रोजी राहत्या घरात नेहा उर्फ पूजा हिचा गळा आवळून खून केल्याची फिर्याद अनिता ठाकूर यांनी ६ जानेवारी २०१४ रोजी दिली. ठाकूर यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुरनं ०२/१४ भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ या प्रकरणाची उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़पीक़ुलकर्णी यांच्या समोर सुनावणी झाली़ यावेळी समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड़ दीपक पाटील- मेंढेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने निलेश लक्ष्मीकांत व्यास याला पत्नी नेहा हिचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली़ दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा १८ डिसेंबर रोजी सुनावल्याची माहिती अ‍ॅड़ दीपक मेंढेकर यांनी दिली़ (प्रतिनिधी) या खून खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारतर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले होते़ यात घटनास्थळाचे पंच, आरोपीचे नातेवाईक, जप्ती पंचांसह १७ जणांची तपासणी करण्यात आली़ अनेक साक्षीदार फितुर झाले होते़ मात्र, फिर्यादी अनिता ठाकूर व तपासाधिकारी यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरली़