४२ हजार लाभार्थ्यांना जीवन सुरक्षा !
By Admin | Updated: October 14, 2016 00:21 IST2016-10-14T00:06:28+5:302016-10-14T00:21:31+5:30
लातूर डाक जीवन विमा योजनेत लातूर राज्यात प्रथम क्रमांकावर गेले आहे़

४२ हजार लाभार्थ्यांना जीवन सुरक्षा !
बाळासाहेब जाधव लातूर
प्रत्येक शासकीय ,निमशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी डाक जीवन विम्याच्या माध्यमातून पोस्टल पॉलीसी काढून आपले व आपल्या कुटूंबाचे जीवन सुरक्षीत केले आहे़ वर्षभरात ४२ हजार ७५० नागरिकांनी लाभार्थ्यानी डाक जीवन विमा योजना काढली आहे़ वर्षाकाठी १९ कोटी २० लाखाचा प्रिमियम जमा केला आहे़ या माध्यमातून कुटूंबाला आधार मिळाला असून डाक जीवन विमा योजनेत लातूर राज्यात प्रथम क्रमांकावर गेले आहे़
लातूरमध्ये एक मुख्य पोस्ट आॅफीस , ३० सब पोस्ट आॅफीस, २५० ब्रँच आॅफीसच्या माध्यमातून मिल्ट्री, पोस्ट, रेल्वे, टेलिफोन कार्यालयातील कर्मचाऱ्यास शासकीय- निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या भविष्यातील जिवन सुरक्षेसाठी पोस्ट कार्यालयाने खास टपाल जीवन विमा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आधार देण्याचे काम केले आहे़ यामध्ये सुरक्षा, संतोष, सुविधा, सुमंगल, युगल सुरक्षा, मुलांसाठी विमा योजना , ग्रामीण डाक विमा या सात योजनांचा समावेश आहे़ या योजनेच्या माध्यमातून ४२ हजार ७६० लाभार्थ्यानी टपाल जिवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पॉलीसी काढल्या आहेत़ या माध्यमातून महिन्याकाठी १ कोटी ६० हजाराचा प्रिमीयम जमा केला जातो तर वर्षाकाठी १९ कोटी २०लाखाचा प्रिमीयम जमा केला जातो़
या योजनेची आंमलबजावणी करण्यासाठी २८१ पोस्टाची कार्यालये कार्यरत असून या कार्यालयाच्या माध्यमातून टपाल जीवन विम्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ यातील संतोष विमा योजनेस लाभार्थ्यातून प्रतिसाद मिळत आहे़ सर्वत्र आॅनलाईन प्रक्रिया सुरू असल्याने विमा हप्ता मात्र कुठेही भरता येतो तसेच कुठेही काढता येत असल्याने या योजनेला नागरीकांतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़