बेपत्ता तरूणाऐवजी दुसऱ्यालाच घेतले ताब्यात

By Admin | Updated: July 11, 2017 00:15 IST2017-07-11T00:14:34+5:302017-07-11T00:15:42+5:30

भोकरदन : जामनेर येथून गायब झालेला तरूण समजून बुलडाणा अर्बन बॅकेतील कर्मचारी केदार सुधीर दामले यांना मनस्तापाला समोरे जावे लागले.

In lieu of the missing son, the other is in possession | बेपत्ता तरूणाऐवजी दुसऱ्यालाच घेतले ताब्यात

बेपत्ता तरूणाऐवजी दुसऱ्यालाच घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : जामनेर येथून गायब झालेला तरूण समजून बुलडाणा अर्बन बॅकेतील कर्मचारी केदार सुधीर दामले यांना मनस्तापाला समोरे जावे लागले. शेवटी पोलिसांनी हा तो नसून दोघांच्या चेहऱ्यामध्ये साम्य असल्यामुळे हा गैरसमज झाला असल्याचे सांगून दामले यांची सुटका केली.
जामनेर (जि़ जळगाव) येथून जितेंद्र गोविंदराव पांढरे (२९) हे गेल्या पंधरा दिवसांपासून घरातून गायब झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी नातेवाईक त्यांचा फोटो घेऊन फिरत आहेत. ८ जुलै रोजी रात्री बुलडाणा बसस्टॅडवरून पांढरे हे मलकापूर - पुणे बसमध्ये बसल्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली. तोपर्यन्त बस औरंगाबादच्या दिशेने भोकरदनपर्यन्त आली होती.
जामनेर पोलिसांनी भोकरदन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रात्री १० वाजेच्या दरम्यान जितेंद्र पांढरे सारख्या दिसणाऱ्या दामले यांना बसमधून उतरवून भोकरदन पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा चालक व वाहकाने हे पांढरे असल्याचे सांगितले. मात्र आपण पांढरे नसून केदार दामले आहे असे त्यांनी सांगितले. तरी सुध्दा खात्री होत नव्हती म्हणून पोलीस कर्मचारी गणेश पायघन यांनी केदार दामले यांना ओळखपत्र मागितले.
त्यांनी ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना परत बसमध्ये बसवून पुण्याकडे रवाना करण्यात आले.

Web Title: In lieu of the missing son, the other is in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.