मुलींसाठी शहरात ग्रंथालय उभारणार
By Admin | Updated: June 19, 2014 00:18 IST2014-06-18T23:59:29+5:302014-06-19T00:18:22+5:30
नांदेड : मराठा समाजातील सामाजिक प्रबोधन व शिक्षणातील दर्जा सुधारावा, यासाठी लवकरच जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून शहरात ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करणार असल्याची

मुलींसाठी शहरात ग्रंथालय उभारणार
नांदेड : मराठा समाजातील सामाजिक प्रबोधन व शिक्षणातील दर्जा सुधारावा, यासाठी लवकरच जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून शहरात ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करणार असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या महानगराध्यक्षा डॉ़ रेखा पाटील यांनी दिली़
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विजयनगर येथे राजमाता जिजाऊ मॉ साहेबांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला़ कार्यक्रमात डॉ़ पाटील बोलत होत्या़ प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे लक्ष्मी गोरे, सुशीला पाटील, संगीता डक पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले़ यानंतर जिजाऊवंदना घेण्यात आली़
डॉ़ पाटील म्हणाल्या, ग्रामीण भागातील मराठा समाजातील मुली शिक्षणामध्ये हुशार आहेत, मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या पुढील शिक्षण घेवू शकत नाहीत़ दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या मुलींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेतले असल्याचे पाटील यांनी सांगितले़ शिक्षणात हुशार असणाऱ्या मराठा समाजातील गरीब व होतकरू मुलींसाठी नांदेड शहरात अद्ययावत ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करण्याचे नियोजन जिजाऊ ब्रिगेड करीत असल्याचे त्यांनी सांगितले़
राजश्री मिरजकर, डॉ़ रूपाली माने यांनी स्पर्धा परीक्षेत समाजातील मुला- मुलींची संख्या वाढविण्यासाठी ेप्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक डॉ़ प्रतिमा डोणगे, डॉ़ मनोरमा पाटील चव्हाण यांनी केले़ यशस्वीतेसाठी सुशीला मनूरकर, रंजना नरवाडे पाटील, ममता माने, जयश्री भायेगावकर, सविता पावडे, देवराये आदींनी परिश्रम घेतले़ यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़ (प्रतिनिधी)