शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तीकडून युक्तीकडे!

By admin | Updated: March 13, 2015 00:43 IST

संजय तिपाले, बीड दहावी अन् बारावी परीक्षा म्हटले की, ‘टर्निंग पॉर्इंट’ आहे जपून... असा सबुरीचा सल्ला हमखासच दिला जातो. गुणवत्तेच्या कसोटीला सामोरे जाताना कॉप्यांचा ‘शॉर्टकट

संजय तिपाले, बीडदहावी अन् बारावी परीक्षा म्हटले की, ‘टर्निंग पॉर्इंट’ आहे जपून... असा सबुरीचा सल्ला हमखासच दिला जातो. गुणवत्तेच्या कसोटीला सामोरे जाताना कॉप्यांचा ‘शॉर्टकट’ शोधण्यात बीडची प्रतिमा मलिन झालेली! गेल्या काही वर्षांत कॉपीमुक्ती अभियानातून कॉप्यांचा डाग पुसून टाकण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, कॉप्या करताना पकडलेल्या बहाद्दरांचा ‘स्कोअर’ वाढतोच आहे. काळानुसार फक्त ‘ट्रेंड’ बदललायं. केंद्रांबाहेरची ‘जत्रा’ ओसरली; पण आतमध्ये सारेच अलबेल आहे, असे नाही. केंद्रांवर मोबाईलच्या सर्रास वापराने गोपनियतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून काही ठिकाणी शिक्षकच ‘कॉपीपुराण’ करत असल्याची माहिती आहे.बारावी परीक्षेस २१ मार्च तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. बारावीसाठी ८८ केंद्रांवर ३२ हजार ४१५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर दहावीसाठी १४३ केंद्रे आहेत. ३९ हजार ८५५ इतके विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रशासनासह सामाजिक संघटना जनजागृती करत आहेत. मात्र, काही परीक्षार्थी कॉपीमुक्तीला खीळ घालत आहेत.‘सेफझोन’मुळे बीडकडे ओढा!काही केंद्रे केवळ कॉप्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पुणे, मुंबईत राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी केवळ सेफझोन म्हणून बीडमध्ये प्रवेश घेतले आहेत. आष्टी तालुक्यातील काही परीक्षा केंद्रांत नियम डावलून शिक्षक, प्राध्यापक मोबाईल वापरतात. प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांना वाटण्यापूर्वीच मोबाईल कॅमेऱ्यात टिपून ती सोशल मीडियावरुन विशिष्ट लोकांना पाठवायची अन् उत्तरे परीक्षार्थ्यांपर्यंत पोहोचवायची... असा हा सिलसिला राजरोस सुरु होता. इतर केंद्रांमध्येही याच प्रश्नपत्रिकेच्या आधारे उत्तरे पोहोचविली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियाचा गैरवापर होत असताना याची कुठे वाच्यताही झाली नाही.काळ बदलला तसे कॉप्या करण्याचे नव्या युक्त्याही रुढ झाल्या. आता सूत्र, प्रमेय, सिद्धांत, रासायनीक समीकरणे अशा ढोबळ बाबींच्या काप्या मोठ्या प्रमाणात होतात. त्याचा मजकूर छोटा असल्याने चिठ्ठ्यांची गरज भासेलच असे नाही तर अगदी हात, पायांच्या नखावर, शरीरावर मजकूर लिहिला जातो. त्यामुळे कॉपी पकडली जाण्याची शक्यता कमी असते. बुट, सॉक्समधून कॉप्या केंद्रात नेणारही अनेक परीर्थीही आहेत. शर्टच्या कॉलरमध्येही काहींनी कॉप्या दडविल्या, काहींनी डोक्याला टक्कल करुन टोप्यांखाली कॉप्या लपवून केंद्रप्रमुखांसह भरारीपथकांना ‘टोपी’ लावण्याची भन्नाट शक्कल शोधून काढली आहे. काही बहाद्दरांनी तोंडामध्ये, पेनांमध्ये चिठ्ठी दडवली. काहीजण ‘डबलपॅड’ आणून त्यामधून कॉप्या केंद्रात घेऊन गेले. डेस्कच्याखाली चिंगम लावून कॉप्यांचा स्टॉक करणारे महाभागही आढळले. कॉप्या करण्यात मुली तरी कशा मागे राहतील? काही मुलींनी ओढणी, बुटात, पेनात कॉप्या लपविल्या. काहींनी हातरुमालाचा आधार घेतला. तळहातावर, नखांवर कॉप्यांचा मजकूर लिहून आणणाऱ्या मुलीही भरारी पथकांना आढळल्या. ४जिल्हा स्तरावर केवळ एकच महिला भरारी पथक आहे. इतर पथकांत महिला अधिकारी असतीलच असे नाही. त्यामुळे मुलींची तपासणी शक्यतो होत नाही, ही बाब ओळखून बरीच मुले कॉप्या मुलींकडेच लपवून ठेवण्यासाठी देतात, असेही एका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.विनाअनुदानीत शाळा अनुदानापात्र होण्यासाठी दहावीच्या निकालाचे गुण पाहिले जातात.४गुणवत्तेला पाच गुण आहेत. या पाच गुणांसाठी विनाअनुदानीत शाळांचे संस्थाचालक व शिक्षक गुणवत्तेचा आलेख वाढता ठेवण्यासाठी धडपडत असतात.४गुणवत्त्तेच्या नादात कॉप्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जाते. परिणामी कॉपीमुक्तीला खीळ बसत आहे.