संपर्क अधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:04 IST2021-05-06T04:04:42+5:302021-05-06T04:04:42+5:30

प्रारंभी खुलताबाद येथील कोविड केअर सेंटरला डॉ. लाहोटी यांनी भेट देऊन पाहणी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे ...

Liaison officers reviewed the corona | संपर्क अधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाचा आढावा

संपर्क अधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाचा आढावा

प्रारंभी खुलताबाद येथील कोविड केअर सेंटरला डॉ. लाहोटी यांनी भेट देऊन पाहणी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे यांनी बाधित रूग्ण संख्या, गाव निहाय रूग्ण संख्येची माहिती दिली. यावेळी डॉ. लाहोटी यांनी कोविड सेंटरमधील रूग्णांची माहिती घेतली तसेच त्यांना सोयीसुविधा, जेवण व्यवस्थित दिले जाते का याबाबत केअर टेकर यांच्याशी चर्चा केली. गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी गावपातळीवर केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. तालुक्यातील पळसवाडीतांडा, शार्दूलवाडी, सोबलगाव येथे भेटी देऊन पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. खुलताबाद तालुक्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता ग्रामस्थांनी आवश्यक असेल तर बाहेर पडावे, तोंडाला मास्क वापरावे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन यावेळी डॉ. राम लाहोटी यांनी केले.

--- कॅप्शन : खुलताबादच्या कोविड सेंटरबाबत माहिती घेताना तालुका संपर्क अधिकारी डॉ. राम लाहोटी.

050521\img_20210505_125349_1.jpg

--- कँप्शन : खुलताबादच्या कोवीड सेंटरबाबत माहिती घेतांना तालुका संपर्क अधिकारी डॉ. राम लाहोटी.

Web Title: Liaison officers reviewed the corona