शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:45 IST

इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो.

औरंगाबाद : इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो. नोकर्‍यांमध्येही आहे. पण या समाजाच्या तरुणांना, व नोकर्‍यांमधून बाहेर पडून उद्योगधंदे करू इच्छिणार्‍यांसाठी शासकीय मदत मिळावी, त्यांना एमआयडीसीत प्राधान्याने भूखंड उपलब्ध व्हावेत, योग्य कर्जपुरवठा व्हावा अशी अपेक्षा लोकमतच्या बिरादरीत व्यक्त करण्यात आली. 

विकास चौधरी, व्ही.आर. महाजन, मधुकर सरोदे, ओमप्रकाश चौधरी आणि सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ किनगे आदींनी बिरादरीच्या या चर्चेत लेवा पाटीदार समाजाच्या समस्यांना वाचा फोडली.लेवा पाटीदार मित्र मंडळ व लेवा पाटीदार प्रोफेशनल असोसिएशनचे  हे सारे जण प्रमुख. गुजरातमध्ये आमचा समाज खुल्या प्रवर्गात आहे. पण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहे, याचे  समाधान त्यांनी व्यक्त केला. लेवा पाटीदार हा मूळचा शेतकरी समाज. जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन घेणारा. पण अलिकडे पाण्याचीपातळी खाली खाली जात असल्याने केळीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. औरंगाबादेत स्थायिक झालेल्या समाजासाठी सामाजिक सभागृह वा मंगल कार्यालय हवे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हवे. यासाठी सरकारने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी विकास चौधरी व सर्वांनी केली. 

माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे, खा. रक्षा चौधरी, आ. राजू भोळे, आ. हरिभाऊ जावळे, प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी, साहित्यिक भालचंद्र नेमाडे अशी नामवंत मंडळी लेवा पाटीदार समाजातून येतात, याबद्दलचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

मुला- मुलींचे विषम प्रमाण ही मोठी समस्या...अन्य समाजाप्रमाणेच लेवा पाटीदार समाजही आज मुला- मुलींच्या विषम प्रमाणास सामोरे जात आहे. जळगाव  व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील मुलांना आज  मुली मिळत नाहीत म्हणून ते विवाह करु शकत नाहीत. मुलांपेक्षा मुली खूप शिकलेल्या आहेत. पण एक हजार मुलांमागे आठशे मुली असे प्रमाण आहे. गावाकडे ५० एकर शेती आहे, पण त्या मुलाला मुलगी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच मुला- मुलींचे जमत नाही म्हणून घटस्फोटाचे प्रमाणही जास्त आहे.यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून औरंगाबादेत लवकरच एक शिबीर घेण्यात येणार आहे. त्याआधी २४ डिसेंबर रोजी नाशिक येथे असे शिबीर होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद