पैठण, लिंकरोडप्रकरणी बांधकाम मंत्र्यांना पत्र

By Admin | Updated: August 8, 2016 00:27 IST2016-08-08T00:22:00+5:302016-08-08T00:27:23+5:30

औरंगाबाद : पैठण आणि पुणे, अहमदनगरकडे जाणाऱ्या दोन्ही रोडची खास बाब म्हणून दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

Letter to Minister for construction of Paithan, Link Road case | पैठण, लिंकरोडप्रकरणी बांधकाम मंत्र्यांना पत्र

पैठण, लिंकरोडप्रकरणी बांधकाम मंत्र्यांना पत्र

औरंगाबाद : पैठण आणि पुणे, अहमदनगरकडे जाणाऱ्या दोन्ही रोडची खास बाब म्हणून दुरुस्ती करण्याची मागणी खा.राजकुमार धूत यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
लोकमतने पैठण लिंकरोडवरील खड्ड्यांचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर खा.धूत यांनी त्या रोडसाठी दुरुस्तीची मागणी केली आहे. खा.धूत यांनी पत्रात म्हटले आहे की, औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी आहे. परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. डीएमआयसीमुळे विदेशी उद्योजकांच्या नजरा इकडे वळत आहेत. पैठण हे तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटक, भाविकांसह उद्योजक आणि नागरिकांची त्या रोडवर वर्दळ असते. परंतु त्या रोडवर प्रचंड खड्डे पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत. परिणामी औरंगाबादच्या नावलौकिकाची बदनामी होत आहे.
रोडप्रकरणी अनेक तक्रारी
रोडप्रकरणी अनेक तक्रारी आल्या आहेत आणि रोज तक्रारी वाढत आहेत. भाविक, पर्यटक, उद्योजक आणि असंख्य नागरिकांना औरंगाबाद ते पैठण आणि पैठण लिंकरोडवरून जाताना त्रास होत आहे. त्यामुळे दोन्ही रस्त्यांची खास बाब म्हणून विनाविलंब योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात यावेत. असे खा.धूत यांनी बांधकाम मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Letter to Minister for construction of Paithan, Link Road case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.