तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:39 IST2017-07-01T00:37:11+5:302017-07-01T00:39:09+5:30

जालना : मुलांनी आयआयटी, इंजिनिअरिंंग क्षेत्रात करिअर करावे या पालकांच्या अपेक्षांमुळे विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे

Lessons of the students to technics | तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांची पाठ

तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुलांनी आयआयटी, इंजिनिअरिंंग क्षेत्रात करिअर करावे या पालकांच्या अपेक्षांमुळे विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे तंत्रनिकेतनमधून पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा घटत असल्याचे चित्र आहे.
शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला १९ जूनपासून सुरुवात झाली आहे. जालना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या ४८० जागा उपलब्ध आहेत. गत बारा दिवसांत ३८० कीटची विक्री झाली असून, ३०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. अंबड शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध ४९८ जागांसाठी २५० कीटची विक्री झाली आहे. पैकी १६० विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत तंत्रनिकेतनला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घटली आहे. पालकांच्या आग्रहामुळे विद्यार्थी विज्ञान शाखेला प्रवेश घेत असल्याचे अधिव्याख्याता पी. यू. औटी यांनी सांगितले.

Web Title: Lessons of the students to technics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.