वडगाव परिसरात बिबट्या?

By Admin | Updated: December 19, 2014 01:02 IST2014-12-19T00:20:29+5:302014-12-19T01:02:31+5:30

वाळूज महानगर : साजापूरपाठोपाठ काल रात्री वडगाव परिसरात बिबट्या अवतरल्याच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे

Leopard in Wadgaon area? | वडगाव परिसरात बिबट्या?

वडगाव परिसरात बिबट्या?

वाळूज महानगर : साजापूरपाठोपाठ काल रात्री वडगाव परिसरात बिबट्या अवतरल्याच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरास भेट देऊन हा बिबट्या नसून तरस असल्याचा दावा केला आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच साजापूर शिवारातील गट नंबर ६५ मध्ये वीटभट्टीवर मजुरांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे मजूर तसेच साजापूरवासीयांत भीतीचे वातावरण पसरले होते. या ठिकाणी वीटभट्टीवरील मजूर बबन खंडागळे, भगवान पवार, राजू गायकवाड व अन्य ८ ते १० मजुरांनी बिबट्या दिसल्याचा दावा केला होता. या वीटभट्टीवरील माती व पोयट्याच्या ढिगाऱ्यावर बिबट्या व त्याचा लहान बछडा जवळपास अर्धा तास थांबल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. या प्रकरणी साजापूरचे उपसरपंच सय्यद कलीम यांनी दौलताबादच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन या बिबट्याचा शोध घेण्याची मागणी केली होती.
दरम्यान, काल १७ डिसेंबरला वडगाव शिवारातील गट नंबर ६६ मध्ये गजानन कटारे यांना बिबट्या दिसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या भागात बिबट्या दिसल्यामुळे माजी उपसरपंच कृष्णा साळे व नागरिकांनी दौलताबादच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खातरजमा करण्याची मागणी केली होती.

Web Title: Leopard in Wadgaon area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.