दावरवाडी परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:45+5:302020-12-17T04:30:45+5:30
दावरवाडी येथील शेतकरी किरण काशीनाथ पवार हे रविवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान दुचाकीने नानेगाव फाट्याकडील शेतात जात असताना लघुप्रकल्पाच्या भिंतीवर ...

दावरवाडी परिसरात बिबट्याची दहशत
दावरवाडी येथील शेतकरी किरण काशीनाथ पवार हे रविवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान दुचाकीने नानेगाव फाट्याकडील शेतात जात असताना लघुप्रकल्पाच्या भिंतीवर दोनशे फुटांच्या अंतरावर हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना बिबट्या उभा असलेला दिसला. त्यांनी त्याला पळविण्यासाठी मोठ्याने गाडीचा हाॅर्न वाजविला, मात्र, बिबट्या ३० सेकंदापर्यंत जागेवरच उभा होता. त्यानंतर तो तलावाच्या खाली शेतात निघून गेला. किरण पवार यांनी मोबाईलमध्ये याचे चित्रीकरणही केले आहे. याबाबत त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणकडे शेतीला दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सदर बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली.
छाया : दावरवाडी/डेरा शिवारात किरण पवार यांनी मोबाईलमध्ये बिबट्याचे टिपलेले छायाचित्र.