सोयगाव तालुक्यात सापडलेला बिबट्या सिद्धार्थ उद्यानात
By Admin | Updated: December 7, 2014 00:19 IST2014-12-07T00:13:00+5:302014-12-07T00:19:46+5:30
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला शुक्रवारी वन विभागाच्या पथकाने बाहेर काढले.

सोयगाव तालुक्यात सापडलेला बिबट्या सिद्धार्थ उद्यानात
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला शुक्रवारी वन विभागाच्या पथकाने बाहेर काढले. शनिवारी पहाटे त्याला सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले.
उद्यानात मागील काही वर्षांपासून बिबट्या नसल्याने बोरीवली व इतर प्राणिसंग्रहालयांकडे मनपाने मागणी केली होती. सिद्धार्थ उद्यानात एक मादी असून, तिच्यासोबत या नवीन बिबट्याला ठेवण्यात येणार आहे. सध्या पायाला मार लागलेला असल्याने बिबट्या लंगडत असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.