आमदारांनी सुचविली साडेबारा कोटींची कामे

By Admin | Updated: July 24, 2014 00:27 IST2014-07-24T00:15:59+5:302014-07-24T00:27:32+5:30

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय मंडळी कामाला लागली असून प्रशासकीय यंत्रणाही सज्ज होत आहे़

Legislators suggested the works of Rs | आमदारांनी सुचविली साडेबारा कोटींची कामे

आमदारांनी सुचविली साडेबारा कोटींची कामे

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय मंडळी कामाला लागली असून प्रशासकीय यंत्रणाही सज्ज होत आहे़ त्याचवेळी विद्यमान आमदार आपल्या स्थानिक विकास निधीतून कामे पूर्ण करण्यात गुंतली आहेत़ यातून निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी उद्घाटन सोहळे पार पडत आहेत़ चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ९ आमदारांनी १२ कोटी ४१ लाख २५ हजारांच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले आहेत़
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी दरवर्षी २ कोटी रूपयांचा निधी दिला जातो़ जिल्ह्यात ९ आमदारांसह एका विधान परिषद सदस्यासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी २० कोटी रूपये प्राप्त झाले आहेत़ त्यातून ६ कोटी १४ लाख २६ हजार रूपये सन २०१३-१४ मधील अपूर्ण कामासाठी आवश्यक आहेत़ उर्वरित निधीतून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपल्या मतदारसंघात कामे सूचविली आहेत़
त्यात नांदेड उत्तर मतदारसंघासाठी पालकमंत्री डी़पी़ सावंत यांनी १ कोटी २९ लाख ६८ हजारांची कामे सूचवले आहेत़ तर आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांनी नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी १ कोटी ८४ लाख ४९ हजार, लोहा मतदारसंघासाठी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांनी १ कोटी ३८ लाख ९ हजार, मुखेड मतदारसंघासाठी आ़ हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी १ कोटी ३१ लाख ६५ हजार, देगलूर मतदारसंघासाठी आ़ रावसाहेब अंतापूरकर यांनी १ कोटी ३३ लाख ७ हजार, नायगाव मतदारसंघासाठी आ़ वसंतराव चव्हाण यांनी १ कोटी ५० लाख ८७, हदगाव मतदारसंघासाठी आ़ माधवराव पाटील जवळगावकर यांनी १ कोटी ३० लाख ३१ हजार, किनवट मतदारसंघासाठी आ़ प्रदीप नाईक यांनी १ कोटी २४ लाख २३ हजार आणि विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी १ कोटी २४ लाख २३ हजार रूपयांची विकासकामे सूचविली आहे़ यासंदर्भात नियोजन अधिकारी डॉ़ किरण गिरगावकर यांनी सांगितले, आमदारांनी विकासकामे सूचविल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून तांत्रिक मान्यतेसह अंदाजपत्रक सादर केले जाते़ त्यानंतर या अंदाजपत्रकांना मंजुरी दिली जाते़ त्या-त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सूचवून मंजुरी घ्यावी लागते़ सन २०१३-१४ साठी उपलब्ध असलेला २ कोटींचा निधी सर्व आमदारांनी उपयोगात आणला आहे़ तर चालू आर्थिक वर्षातही आमदारांनी जवळपा १ कोटी २५ लाखांपासून १ कोटी ७५ लाखांपर्यंत विकासकामे सूचविली आहेत़ (प्रतिनिधी)
आमदारांना पुन्हा मिळाली दोन कोटींची संधी़़़!
विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे आॅक्टोबर २०१४ अखेर समाप्त होत आहे़ ही बाब विचारात घेता विद्यमान विधानसभेच्या सदस्यांना २०१४-१५ या वर्षातील जवळपास ७ महिन्यांच्या कालावधीसाठी १ कोटी १६ लाख ६६ हजार रूपये नियोजन विभागाने मंजूर केले होते़
मात्र त्या निर्णयास १० जून २०१४ च्या पत्रानुसार नियोजन विभागाने स्थगिती देत विद्यमान विधानसभा सदस्यांना २ कोटींच्या मर्यादेत कामे सूचविण्यास मान्यता दिली आहे़

Web Title: Legislators suggested the works of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.