शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईत कायदा पायदळी; नवरीच मिळत नसल्यामुळे २४ वर्षांनी लहान मुलीसोबत विवाहाचा घाट

By राम शिनगारे | Updated: May 24, 2023 16:19 IST

बालकल्याण समितीसमोर १५ दिवसात ११ बालविवाहाची प्रकरणे सादर

छत्रपती संभाजीनगर : सध्या सगळीकडे लग्नाची धूम सुरू आहे. त्यात अल्पवयीन मुलींचे लग्न आई-वडील लावून देत असल्याचे समोर येत आहे. बालकल्याण समितीसमोर मागील १५ दिवसांमध्ये ११ बालविवाह रोखल्याची प्रकरणे सादर झाली. त्यात एका विवाहात नवरीचे वय १६, तर नवरदेव ४० वर्षांचा प्रौढ होता. ४० वर्षांच्या जरठ प्रौढास लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्यामुळे त्याने गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला शोधून लग्नाचा घाट घातल्याचे बालकल्याण समितीच्या चौकशीत समोर आले आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षे होणे आवश्यक आहे. दोघांपैकी एकाचेही वय पूर्ण झालेले नसेल तर लग्न बेकायदेशीर ठरते. त्यात दोन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. सध्या लग्नसराई असल्यामुळे पोलिस, बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती दक्ष आहेत. बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी पोलिसांसह इतर विभागांचे अधिकारी जाऊन बालविवाह रोखतात. त्यानंतर संबंधितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे लागते. मागील १५ दिवसात बालकल्याण समितीसमोर बालविवाहाची ११ प्रकरणे आली. यातील सर्वच मुलींचे वय १८ वर्षांखालील होते, अशी माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने - कटके यांनी दिली.

दोघांमध्ये १२ ते १५ वर्षांचे अंतररोखलेल्या बालविवाहात नवरा आणि नवरीत सरासरी १२ ते १५ वर्षे एवढे वयाचे अंतर होते. नवरीचे सरासरी वय १६ असून, होणारा पती हा ३० वर्षांचा असल्याचेही स्पष्ट झाले.

गरिबी हेच मुख्य कारण१८ वर्षांच्या आत मुलीचा विवाह लावून जबाबदारीतून मुक्त होण्याची घाई आई - वडिलांना झालेली असते. त्यात गरिबी, मुलींची सुरक्षितता, पालकांचा अशिक्षितपणा ही विवाहाची मुख्य कारणे आहेत.

बालविवाहाची माहिती कळवाबालविवाह राेखल्यानंतर वधू - वरांच्या आई - वडिलांना बालकल्याण समितीसमोर बोलवले जाते. त्यांना विश्वासात घेऊन बालविवाहाचे धोके सांगण्यात येतात. मुलीचा बालविवाह केल्यास तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तिचे सर्व प्रकारे शोषण होते. अल्पवयातच अपत्य होण्याच्या शक्यतेमुळे मुलीच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोठेही बालविवाह होत असेल तर समितीला कळवावे.-ॲड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्षा, बालकल्याण समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी