शहरात एलईडी दिवे लागणार तरी कधी ?
By Admin | Updated: July 6, 2016 23:47 IST2016-07-06T23:35:01+5:302016-07-06T23:47:19+5:30
जालना : नगर पालिकेने गाजावाजा करत शहरातील विविध भागात एलईडी दिवे बसविण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही शहरात एलईडी दिव्यांचा प्रकाश न पडल्याने बहुतांश शहर अंधारातच आहे.

शहरात एलईडी दिवे लागणार तरी कधी ?
जालना : नगर पालिकेने गाजावाजा करत शहरातील विविध भागात एलईडी दिवे बसविण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही शहरात एलईडी दिव्यांचा प्रकाश न पडल्याने बहुतांश शहर अंधारातच आहे.
पालिकेचे शहरात १४ हजार पेक्षा अधिक पथदिवे आहेत. मात्र, साडे नऊ कोटी रूपयांच्या थकबाकीमुळे महावितरणने या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे शहरात पाच वर्षांपासून अंधार आहे. वीज बिलात बचत व्हावी म्हणून पालिकेने संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावण्याची घोषणा केली. निविदा प्रक्रीयाही पूर्ण झाली. मात्र, अद्यापही हे दिवे लागलेले नाहीत.
हे दिवे लवकरच शहरात लागतील असे पालिकेच्या विद्युत अभियंत्यानी सांगितले. मात्र, अद्यापही हे दिवे लागले नाहीत. संपूर्ण शहरात अंधार असल्याने रात्री घराबाहेर पडणे जिकीरीचे बनले आहे. नगर पालिकेने शहरात बंद असलेले पथदिवे सुरू करावेत. तसेच नवीन एलईडी दिवे तात्काळ लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही एलईडी पथदिव्यांचा मुद्दा गाजला. मात्र प्रत्यक्षात एकाही खांबावर एलईडी दिवे अद्याप लागलेले नाहीत. (प्रतिनिधी)