एलईडी बसविण्याचे काम संथगतीने...!
By Admin | Updated: September 25, 2016 23:58 IST2016-09-25T23:54:34+5:302016-09-25T23:58:14+5:30
जालना : शहरात मोठा गाजावाजा करून एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, काही भागांतच हा प्रकाश पडला. परिणामी गणेशोत्सव अंधारात गेला.

एलईडी बसविण्याचे काम संथगतीने...!
जालना : शहरात मोठा गाजावाजा करून एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, काही भागांतच हा प्रकाश पडला. परिणामी गणेशोत्सव अंधारात गेला. आता नवरात्रोत्सवात तरी संपूर्ण शहरात एलईडीचा प्रकाश पडावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नगर पालिकेने एका कंत्राटदारामार्फत शहरात चौदा हजार एलईडी दिवे बसविण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक प्रमुख मार्गावर ४० ते ७० व्हॅटचे दिवे बसविण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र, काही भागांतच हे दिवे लावण्यात आले आहेत. अद्यापही शनि मंदिर उड्डाणपूल, गांधी चमन ते रेल्वेस्थानक, मोतीबाग, भाग्य नगर, चंदनझिरा, संभाजीनगर, बसस्थानक परिसर, कॉलेज रोड आदी भागांत अद्यापही अंधार आहे. नवरात्रोत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वच शहरात नगर पालिकेने युद्ध पातळीवर एलईडी दिवे बसवावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पालिकेकडून सर्वच शहरात पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक मार्गनिहाय हे काम सुरू आहे. आगामी काही दिवसांत हे दिवे लाबवण्यात येतील, असे पालिकेच्या विद्युत अभियंत्यांनी सांगितले.