प्रभावी पालकत्व विषयावर उद्या व्याख्यान
By Admin | Updated: January 15, 2016 00:17 IST2016-01-14T23:47:14+5:302016-01-15T00:17:56+5:30
औरंगाबाद : युनिव्हर्सल हायस्कूल आणि लोकमत कॅम्पस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १६ रोजी प्रभावी पालकत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभावी पालकत्व विषयावर उद्या व्याख्यान
औरंगाबाद : युनिव्हर्सल हायस्कूल आणि लोकमत कॅम्पस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १६ रोजी प्रभावी पालकत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील युनिव्हर्सल हायस्कूलच्या मैदानावर व्याख्यान होणार आहे. यासाठी प्रमुख वक्त्या मुंबई येथील मानसोपचारतज्ज्ञ फातिमा रशिद यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्या काऊन्सलिंग अॅण्ड रिसर्च डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. मागील १५ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी त्या युनिव्हर्सल समूहाबरोबर कार्यरत आहेत. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनिक आणि मानसिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. व्याख्यान दोन सत्रांत होणार आहे. पहिले सत्र सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान होणार आहे. यात २ ते ६ वर्षे वयाच्या मुलांच्या पालकांसाठी तर दुसरे सत्र दुपारी ३.३० ते ५.३० वाजेदरम्यान ७ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांना संबोधित करण्यात येणार आहे. व्याख्यानात प्रभावी पालकत्वाच्या टिप्स, त्याचबरोबर मुलांना टी.व्ही. कॉम्प्युटर, मोबाईल फोन यांच्यापासून कसे दूर ठेवावे याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. व्याख्यान नि:शुल्क असून पालकांनी वेळेच्या अर्धा तास आधी शाळेत हजर राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.